Join us

‘स्टोरीटेल’वरील ऑडिओबुक्स आता ११ भारतीय भाषांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 09:55 IST

Storytel: भारतातील विविध भाषांमधील ऑडिओबुक्सची मागणी आणि आवड बघता स्टोरीटेलने आता श्रोत्यांसाठी ११ भारतीय भाषांमधील एक विशेष सबस्क्रिप्शन प्लॅन उपलब्ध करून दिला आहे.

मुंबई : भारतातील विविध भाषांमधील ऑडिओबुक्सची मागणी आणि आवड बघता स्टोरीटेलने आता श्रोत्यांसाठी ११ भारतीय भाषांमधील एक विशेष सबस्क्रिप्शन प्लॅन उपलब्ध करून दिला आहे. ‘सिलेक्ट’ असे या प्लॅनचे नाव असून यात आपल्याला ११ स्थानिक भारतीय भाषांमधील ऑडिओबुक्स ऐकता येणार आहेत.   याआधी फक्त मराठी भाषेसाठी सिलेक्ट प्लॅन उपलब्ध करण्यात आला होता. आता हिंदी, मराठी, उर्दू, बंगाली, तमिळ, मल्याळम, तेलुगू, आसामी, गुजराती, ओडिसी आणि कन्नड या ११ भारतीय भाषांमधील विविध ऑडिओबुक्स दरमहा १४९/- रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहेत. स्टोरीटेलच्या ग्राहकांना आता सबस्क्रीपिशनचे अनलिमिटेड आणि सिलेक्ट असे दोन पर्याय उपलब्ध होतील. ‘अनलिमिटेड’ योजनेत  २९९ रुपयांत ११ भाषांतील आणि आंतरराष्ट्रीय इंग्रजी भाषेतील अभिजात पुस्तकेही ऐकायला  मिळतील.  (वा. प्र.)

टॅग्स :व्यवसाय