Join us

दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 21:38 IST

Atal Pension scheme: आतापर्यंत 7.60 कोटी भारतीयांनी या योजनेत पैसे गुंतवले आहेत.

Atal Pension scheme: तुम्हाला म्हातारपणात पेन्शनची चिंता सतावत असेल, तर तुम्ही दररोज फक्त 7 रुपये गुंतवून या चिंतेपासून मुक्त होऊ शकता. या सरकारी योजनेत दरमहा किमान 5000 रुपये हमी पेन्शनची हमी आहे. या योजनेचे फायदे इतके जास्त आहेत की, तिच्या भागधारकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या आर्थिक वर्षात 1.17 कोटी भागधारक या 'अटल पेन्शन' योजनेत सामील झाले आहेत. यासह योजनेशी संबंधित एकूण भागधारकांची संख्या 7.60 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.

अटल पेन्शन योजना2024-25 या आर्थिक वर्षात 1.17 कोटी भागधारक अटल पेन्शन योजनेत सामील झाले. यासह योजनेशी संबंधित भागधारकांची संख्या 7.60 कोटींवर पोहोचली आहे. तर, योजनेअंतर्गत व्यवस्थापनाखालील मालमत्ता 44,780 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. आतापर्यंत यावर सरासरी वार्षिक परतावा 9.11 टक्के आहे. विशेष म्हणजे, पीएफआरडीएनुसार, 2024-25 मध्ये जोडलेल्या नवीन भागधारकांपैकी 55 टक्के महिला होत्या.

काय आहे अटल पेन्शन योजना?असंघटित क्षेत्रासाठी सुरू केलेल्या अटल पेन्शन योजनेंतर्गत 60 वर्षांच्या वयापासून व्यक्तीला त्याच्या योगदानावर दरमहा 1000 ते 5000 रुपये पेन्शन मिळते. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ही पेन्शन त्याच्या/तिच्या जोडीदाराला दिली जाते आणि जोडीदाराच्या मृत्यूनंतर जमा झालेली पेन्शनची रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला परत केली जाते.

कोणाला गंतवणूक करता येणार ?भारतातील कोणताही नागरिक या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो आणि योजनेचे लाभ घेऊ शकतो. ही योजना तुमच्या निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची हमी देते. 18 ते 40 वयोगटातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेत त्या व्यक्तीला 6 व्या वर्षानंतर निश्चित पेन्शन मिळू लागते.

अटल पेन्शन योजनेत तुमची पेन्शन तुम्ही किती रक्कम गुंतवता आणि किती वेळ गुंतवता त्यानुसार ठरवली जाते. म्हणजेच, तुम्हाला किती पेन्शन मिळेल, हे तुमच्या वयावर आणि योगदानावर अवलंबून आहे. यामध्ये तुम्हाला किमान 1000 आणि कमाल 5000 रुपये पेन्शन मिळेल. जर तुम्ही 18 वर्षांचे असाल आणि या योजनेत दरमहा फक्त 210 रुपये गुंतवले, तर 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळेल. 80C अंतर्गत प्रीमियमवर कर सूट देखील उपलब्ध आहे.

 

टॅग्स :गुंतवणूकव्यवसाय