Join us
Daily Top 2Weekly Top 5

एका बिटकाॅइनसाठी माेजा तब्बल ८६ लाख रुपये, ट्रम्प इफेक्ट; महिनाभरात ४५ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 11:48 IST

बिटकाॅइन ही एकप्रकारची क्रिप्टाेकरन्सी आहे. याची सुरूवात २००९मध्ये झाली हाेती. त्यावेळी फक्त ६ पैसे एवढी किंमत हाेती. भारतात क्रिप्टाेकरन्सीद्वारे हाेणाऱ्या उत्पन्नावर ३० टक्के कर आकारण्यात येताे.

वाॅशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डाेनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर बिटकाॅइनची किंमत प्रथमच १ लाख डाॅलरवर पाेहाेचली आहे. भारतीय चलनानुसार एका बिटकाॅइनची किंमत ८६.९१ रुपयांवर पाेहाेचली आहे. गुरुवारी बिटकाॅइनची किंमत १,०२,५८५ डाॅलर एवढी हाेती. गेल्या महिनाभरात किंमतीमध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे.

बिटकाॅइन ही एकप्रकारची क्रिप्टाेकरन्सी आहे. याची सुरूवात २००९मध्ये झाली हाेती. त्यावेळी फक्त ६ पैसे एवढी किंमत हाेती. भारतात क्रिप्टाेकरन्सीद्वारे हाेणाऱ्या उत्पन्नावर ३० टक्के कर आकारण्यात येताे. (वृत्तसंस्था)

वर्षभरात दुपटीपेक्षा जास्त वाढ

वर्षभरात बिटकाॅइनची किंमत ११८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर बिटकाॅइनमध्ये माेठी तेजी आली.

गेल्या वर्षी ६ डिसेंबरला ४३,४९४ डाॅलर एवढी किंमत बिटकाॅइनची हाेती. नजीकच्या काळात किमतीत आणखी वाढ हाेण्याची शक्यता आहे.

टॅग्स :बिटकॉइन