Join us

तब्बल १,१०० टक्के भडकले गॅस सिलिंडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 07:37 IST

महागाईने पार मोडले पाकिस्तानचे कंबरडे

इस्लामाबाद : पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस आणखी खंगत आहे. सरकारी आकड्यांनुसार चार महिन्यांत महागाई दर वाढून ४० टक्क्यांहून अधिक झाला. भारताचा महागाई दर सप्टेंबरमध्ये ५ टक्केच्या  आसपास तर ऑक्टोबरमध्ये ५ टक्केपेक्षा कमी होता. यावरून दोन्ही देशांमधील तफावत समोर येईल. 

सर्वच वस्तू आणि सेवांचे दर वाढल्याने तेथील सर्वसामान्य जनतेचे मात्र हाल सुरु झाले आहेत. पाकिस्तानच्या ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार १६ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात महागाई मागील वर्षीच्या तुलने ४१.९ टक्के होती.

किमती अशा भडकल्या...

उत्पादन     वाढीचे प्रमाण  गॅस सिलेंडर    ११००%गव्हाचे पीठ     ८६.४%मिरची पावडर    ८२%बासमती तांदूळ    ७७%चहा पावडर     ५५%साखर     ५०%

महागाई दर ऑगस्टमध्ये २४.४ टक्केपर्यंत 

nभारतात दर महिन्याला दराचे आकडे जारी होेतात. पाकिस्तानात दर आठवड्याला येतात. पाकच्या ५० बाजारांमधील वस्तूंच्या किमतींचा आधार घेतला जातो.

nमहागाईदराने आतापर्यंत आजवरचा ४८.३५ टक्क्यांचा उच्चांक गाठलेला आहे. ऑगस्टमध्ये यात मोठी घट होऊन तो २४.४ टक्केपर्यंत खाली आला होता. 

टॅग्स :गॅस सिलेंडरपाकिस्तान