Join us

होम लोनसाठी पात्र आहात? कशी ठरते तुमची पात्रता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 08:39 IST

ऑनलाइन कॅल्क्युलेटर आहे जो तुम्ही कर्जासाठी अर्ज करण्याआधीच, तुम्ही किती कर्जासाठी पात्र आहात याचा अंदाज लावतो.

घर खरेदीसाठी कर्ज घेण्याआधी तुम्ही किती रक्कम कर्ज म्हणून सहजपणे घेऊ शकता आणि परतफेड करू शकता, हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. हे समजून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे होम लोन इलिजिबिलिटी कॅल्क्युलेटरचा वापर करणे. ही एक ऑनलाइन सुविधा असून, ती तुमच्या उत्पन्नावर, सध्याच्या आर्थिक जबाबदाऱ्यांवर आणि इतर काही घटकांवर आधारित तुम्ही किती कर्ज घेऊ शकता याचा अंदाज देते.

हा एक ऑनलाइन कॅल्क्युलेटर आहे जो तुम्ही कर्जासाठी अर्ज करण्याआधीच, तुम्ही किती कर्जासाठी पात्र आहात याचा अंदाज लावतो. यासाठी पुढील तपशील विचारात घेतले जातात : मासिक उत्पन्न I जन्मतारीख I सध्याचे कर्ज I  शहर I हे सर्व तपशील भरल्यावर, तुम्ही किती कर्ज मिळेल याचा अंदाज कॅल्क्युलेटर देतो.

कशी कर्ज पात्रता ठरते? उत्पन्न : नियमित व स्थिर उत्पन्न असल्यास पात्रता वाढते.वय : वय २१ ते ७० दरम्यान असलेले अर्जदार प्राधान्याने पात्र मानले जातात.सध्याचे कर्ज : जर उत्पन्नाचा मोठा भाग आधीच ईएमआयमध्ये जात असेल तर पात्रता कमी होते.क्रेडिट स्कोअर : ७५० किंवा त्याहून अधिक स्कोअर चांगला मानला जातो.नोकरी/व्यवसाय स्थैर्य : नियमित पगार किंवा स्थिर व्यवसाय उत्पन्न असल्यास पात्रता वाढते.

टॅग्स :बँक