Join us

लक्ष्मीविलास बँकेच्या विलीनीकरणास मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 02:31 IST

पुरेसे भांडवल नसल्याने लक्ष्मीविलास बँकेवर रिझर्व्ह बँकेने १७ नोव्हेंबर रोजी निर्बंध आणले. बँकेतील खातेधारकांना २५ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यावर निर्बंध आणण्यात आले

नवी दिल्ली : लक्ष्मीविलास बँकेच्या विलीनीकरणाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. लक्ष्मीविलास बँक सिंगापूर येथील डीबीएस बँकेच्या भारतीय शाखेत विलीन होणार आहे. विलीनीकरणानंतर डीबीएस बँक लक्ष्मीविलास बँकेत अडीच हजार कोटी रुपयांचे भांडवल ओतणार आहे. 

पुरेसे भांडवल नसल्याने लक्ष्मीविलास बँकेवर रिझर्व्ह बँकेने १७ नोव्हेंबर रोजी निर्बंध आणले. बँकेतील खातेधारकांना २५ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यावर निर्बंध आणण्यात आले. ९४ वर्षांच्या लक्ष्मीविलास बँकेचा दक्षिण भारतात मोठा दबदबा आहे. तसेच भारतभरातही तिच्या शाखा आहेत. रिझर्व्ह बँकने लादलेल्या निर्बंधांमुळे बँकेच्या खातेधारकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, बँकेचे डीबीएस बँकेत विलीनीकरण होणार असल्याने निर्बंध काही काळापुरतेच राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत लक्ष्मीविलास बँकेच्या विलीनीकरणास मंजुरी देण्यात आली. बँकेच्या विलीनीकरणानंतर खातेदारांवर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँक