Join us  

भारीच! Apple नवा विक्रम करणार, भारतात १ लाख कोटी रुपयांचे iPhone बनवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 6:06 PM

Apple आता आयफोनची निर्मिती भारतातच करणार आहे. २०२४ ला Apple ने मोठं उद्दिष्ट ठेवलं आहे.

Apple आता आयफोनची निर्मिती भारतातच करणार आहे. अॅपल आता भारतात नवा रेकॉर्ड बनवणार आहे. भारतात आयफोन बनवण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. Apple पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच FY24 मार्चपर्यंत भारतात १ लाख कोटी रुपयांचे iPhone बनवण्याचे नियोजन करत आहे. या संदर्भात Apple मधील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, अॅपलने मार्च २०२४ ला संपणाऱ्या या आर्थिक वर्षात भारतात सुमारे १ लाख कोटी रुपयांच्या आयफोनचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

UPI पेमेंटचा वापर करता? मग लक्ष द्या... 31 डिसेंबरपर्यंत 'हे' UPI आयडी बंद होणार

Apple ने आपली उत्पादन क्षमता वाढवली आहे आणि पहिल्या सात महिन्यांत ६०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पादन केले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज क्युपर्टिनोने पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हे लक्ष्य पूर्ण केले नाहीतर ते आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत पूर्ण करेल. भारत हा स्मार्टफोनचा सर्वात मोठा ग्राहक आहे.

भारतात उत्पादित होणार्‍या आयफोनपैकी ७०% आयफोन निर्यात केले जातात. आतापर्यंत, Apple ने या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत  ४०,००० कोटी रुपये किमतीचे iPhones निर्यात केले आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांमध्ये सणासुदीची मागणी पूर्ण करण्यासाठी तयारी सुरू आहे. अनेक जागतिक समस्यांमुळे पाश्चिमात्य देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर कमी झाला आहे आणि त्यामुळे मागणीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहित भारतातून ५ अब्ज डॉलर निर्यातीचा टप्पा पार करणारा iPhone हा पहिला एकमेव ब्रँड बनला आहे. या वर्षी, Apple ने पहिल्या सात महिन्यांत निर्यातीत १८५% ची वार्षिक वाढ पाहिली आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत कंपनीने १४,००० कोटी रुपयांचे आयफोन निर्यात केले. अॅपलचे भारतात उत्पादन तैवानच्या फॉक्सकॉन आणि तामिळनाडूमधील पेगाट्रॉनद्वारे केले जाते. याशिवाय, पीएलआय योजनेचा भाग म्हणून, विस्ट्रॉन  देखील आता आयफोन बनवते. आयफोन १२ ते १५ मॉडेल येथे बनवले जातात.

टॅग्स :अॅपलमोबाइल