शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतूनही चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, शेअर बाजारातही तोटा होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि ट्रेडिंग करताना गुंतवणूकदारांनी काही खबरदारी घ्यावी, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचं नुकसान सहन करावं लागणार नाही. तसंच नुकसान होऊ नये म्हणून तज्ज्ञांच्या सल्लाशिवाय कोणतीही गुंतवणूक करणं टाळलं पाहिजे. दरम्यान, शेअर बाजाराशी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याबद्दल अधिक जाणून घेऊ.
स्टॉक मार्केटमधील गुंतवणूक आणि ट्रेडिंगसाठी डीमॅट खातं आवश्यक आहे. डीमॅट खातं खरेदी केलेले शेअर्स सुरक्षितपणे ठेवण्यासाठी एक माध्यम प्रदान करतं आणि खरेदी केलेले शेअर्स विकण्याचा पर्याय देखील देतं. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खातं खूप महत्त्वाचं आहे. आता डीमॅट खात्याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.देशात डिमॅट खाती असलेल्या लोकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे हा आकडा आता १० कोटींच्या पुढे गेलाय. ही देखील मोठी कामगिरी मानली जात आहे. याशिवाय देशातील जनता शेअर बाजाराकडे आकर्षित होत असल्याचंही यावरून दिसून येतं.काय म्हटलं सीडीएसएलनं?आपल्या प्लॅटफॉर्मवरील डिमॅट खात्यांची संख्या १० कोटींच्या पार गेली असल्याची माहिती सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेसनं बुधवारी दिली. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडनं (CDSL) १९९९ मध्ये कामकाज सुरू केलं आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात स्टॉक एक्स्चेंजवर सिक्युरिटीज, व्यवहार आणि डील सेटलमेंटची सोय केली. आपल्या प्लॅटफॉर्मवर १० कोटींहून अधिक डिमॅट खाती झाली असून मैलाचा दगड पार केल्याचं सीडीएसएलनं निवेदनाद्वारे सांगितलं.
सीडीएसएलच्या उपकंपन्यांपैकी एकामध्ये सीडीएसएल व्हेंचर्सचाही समावेश आहे. ही देशातील पहिली आणि सर्वात मोठी केवायसी नोंदणी एजन्सी आहे. २००८ मध्ये व्यवसाय सुरू केल्यापासून त्यांचे ४.५ कोटींहून अधिक रेकॉर्ड आहेत. याशिवाय, सीडीएसएल इन्शुरन्स रिपॉजिटरी आणि सीडीएसएल कमोडिटी रिपॉझिटरी या देखील त्याच्या सहयोगी कंपन्या आहेत.