Join us  

राणा कपूरसह पत्नीवर आणखी एक गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 5:41 AM

अमृता शेरगिलच्या बंगल्याच्या व्यवहारात घोटाळा केल्याचे स्पष्ट झाल्याने कपूर दाम्पत्यासह त्यांचा साहाय्यक गौतम थापरविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई : हजारो कोटींचा बॅँक घोटाळा करून खातेदारांना आर्थिक संकटात टाकलेल्या येस बॅँकेचा संस्थापक राणा कपूर, पत्नी बिंदू कपूरसह तिघांविरुद्ध केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने (सीबीआय) आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. अमृता शेरगिलच्या बंगल्याच्या व्यवहारात घोटाळा केल्याचे स्पष्ट झाल्याने कपूर दाम्पत्यासह त्यांचा साहाय्यक गौतम थापरविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.राणा कपूर गेल्या रविवारपासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात असून सोमवार, १६ मार्चपर्यंत कोठडीची मुदत आहे.ईडीने ६ मार्चला राणा कपूरच्या वरळीतील समुद्र महल येथील फ्लॅट व कार्यालयावर छापे मारले होते. रविवारी पहाटे ईडीने त्याला अटक केली. त्यानंतर सीबीआयने धाड सत्र राबवले. त्यांच्या तिन्ही मुलींकडे कसून चौकशी सुरू असून, त्यांना‘लूक आउट’ नोटीस जारी केली आहे. सीबीआयच्या छाप्यांमध्ये अमृता शेरगिलच्या थकीत कर्जाप्रकरणी बॅँकेने बंगला जप्त केला होता, मात्र त्याचा रीतसर लिलावन करता तो त्यांनी स्वत:साठी खरेदी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कपूर दाम्पत्य व त्यांचा साहाय्यक गौतम थापर यांच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल केला.

टॅग्स :येस बँकबँकिंग क्षेत्रमुंबई