Join us
Daily Top 2Weekly Top 5

TATA च्या 'या' कंपनीत पुन्हा मोठा 'सायलेंट कट'; Q3 मध्ये ११ हजार जणांची कपात, दोन तिमाहीत ३० हजार जणांची गेली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 08:26 IST

TATA Job Cut: देशातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मधील कर्मचाऱ्यांची संख्या सलग दुसऱ्या तिमाहीत कमी झाली आहे.

TATA Job Cut: देशातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मधील कर्मचाऱ्यांची संख्या सलग दुसऱ्या तिमाहीत कमी झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ च्या तिमाहीत (Q3 FY26) कंपनीचे ११,१५१ कर्मचारी कमी झाले आहेत, ज्यामुळे आयटी क्षेत्रातील नोकरीच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी सप्टेंबरच्या तिमाहीतही कंपनीने १९,७५५ कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती. दोन तिमाहींमध्ये एकूण ३० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची घट झाल्यानं जॉब मार्केटबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

TCS ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस कंपनीत ५,८२,१६३ कर्मचारी राहिले आहेत, तर सप्टेंबर तिमाहीत ही संख्या ५,९३,३१४ होती. म्हणजेच कंपनीचं एकूण वर्कफोर्स आता सहा लाखांच्या खाली आलं आहे. दरम्यान, आयटी सेवांमधील कंपनीचा ऐच्छिक ॲट्रिशन रेट १३.५% राहिला आहे, जो मागील तिमाहीच्या तुलनेत स्थिर असला तरी उच्च पातळीवर कायम आहे.

कंपनीचं म्हणणं काय?

कंपनी व्यवस्थापनाचं म्हणणं आहे की, ही कपात कोणत्याही मोठ्या कर्मचारी कपात मोहिमेचा भाग नसून, 'यूटिलायझेशन' सुधारणं आणि 'टॅलेंट ऑप्टिमायझेशन'च्या रणनीती अंतर्गत करण्यात आली आहे. TCS चे सीईओ के. कृतिवासन म्हणाले की, कंपनीचे लक्ष स्वतःला जगातील सर्वात मोठी 'AI-लीड' तंत्रज्ञान सेवा कंपनी बनवण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी माहिती दिली की, TCS च्या AI सेवांमधून आता १.८ अब्ज डॉलरचं वार्षिक उत्पन्न मिळत आहे, जे इन्फ्रास्ट्रक्चरपासून इंटेलिजन्सपर्यंत केलेल्या गुंतवणुकीचा परिणाम आहे.

टीसीएसचा निकाल

आर्थिक निकालांबद्दल बोलायचं झाल्यास, Q3 FY26 मध्ये TCS च्या एकत्रित महसुलात (Consolidated Revenue) तिमाही आधारावर २% आणि वार्षिक आधारावर ४.९% वाढ नोंदवण्यात आली आहे. डॉलरच्या स्वरूपात कंपनीचं उत्पन्न ७.५ अब्ज डॉलर राहिलंय. मात्र, वार्षिक आधारावर डॉलर महसुलात किरकोळ घटही पाहायला मिळाली. या तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग मार्जिन २५.२% आणि नेट मार्जिन २०% राहिलं, तर ऑपरेशन्समधून मिळणारा कॅश फ्लो निव्वळ नफ्याच्या १३०% पेक्षा जास्त होता.

मागणीच्या आघाडीवर TCS ला काहीसा दिलासा मिळाला आहे. १०० मिलियन डॉलरपेक्षा जास्त महसूल देणाऱ्या क्लायंटची संख्या वाढली आहे, तसंच या तिमाहीतील ऑर्डर बुक ९.३ अब्ज डॉलरचं राहिलंय, ज्यामध्ये उत्तर अमेरिका आणि BFSI क्षेत्राचा मोठा वाटा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : TCS Faces Major Silent Cuts: 30,000 Jobs Lost in Two Quarters

Web Summary : TCS sees a significant drop in employee numbers. Over 11,000 jobs were cut in Q3, following nearly 20,000 cuts in the previous quarter, totaling over 30,000 job losses. The attrition rate remains high despite workforce optimization.
टॅग्स :टाटानोकरी