Join us
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या किती कमवतात अदानी-अंबानींचे मुलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 13:56 IST

आता देशातील अंबानी आणि अदानी या उद्योगपती घराण्यातील मुलं किती पैसे कमवतात याची चर्चा होत आहे.

भारतात सध्या काही उद्योगपती घराणी चांगलीच चर्चेत आहेत. त्यासोबतच त्यांची मुलं-मुलीही चर्चेत आहेत. यात अंबानी आणि अदानींच्या मुलांची अधिक चर्चा होत आहे. त्यांच्याकडे किती संपत्ती आहे. ते काय करतात त्यांना किती पैसा मिळतो अशा काही गोष्टी हे जाणून घेण्यात अनेकांना इंटरेस्ट असतो. आता देशातील अंबानी आणि अदानी या उद्योगपती घराण्यातील मुलं किती पैसे कमवतात याची चर्चा होत आहे.

मुकेश अंबानीच्या मुलांची सॅलरी:

भारतातील एक मोठे उद्योगपती म्हणजे मुकेश अंबानी. मुकेश अंबानींचा मुलगा आकाश अंबानी आणि मुलगी ईशा अंबानी यांचं सॅलरी पॅकेज अजून ठरलं नाहीये. सध्या ते दोघेही रिलायंस ग्रुपच्या टेलिकॉम आणि रिटेल व्हेंचर्समध्ये महत्वाची भूमिका निभावत आहेत. नुकत्याच लॉन्च केलेल्या रिलायंस जिओचं संपूर्ण काम ईशा आणि आकाश अंबानी हे बघत आहेत.

अदानीच्या मुलाची सॅलरी:

गुजराती उद्योगपती गौतम अदानीचा मुलगा करनला अदानी पोर्ट्स अ‍ॅन्ड स्पेशल इकॉनॉमिक्स झोन लिमिटेडचा सीईओ म्हणून नेमलं गेलं आहे. बोर्डने करनसाठी वार्षिक १.५ कोटीचं पॅकेज ठरवलं आहे. यात सॅलरी आणि दुसरे बेनिफिट्सही आहेत.

अनिल अंबानींच्या मुलाची सॅलरी:

अनिल अंबानीचा मुलगा अनमोल अंबानी याला ग्रुपच्या फायनॅन्शिअल सर्व्हिस आर्म रिलायंस कॅपिटलमध्ये डिरेक्टर ऑन बोर्ड निवडलं गेलं आहे. कंपनीत त्याची सॅलरी १० लाख रूपये दर महिना ठरली आहे. त्याला वार्षिक १.२ कोटी रूपये मिळतील. अनमोल याला ५ वर्षांपर्यंत एक्झिक्युटीव्ह डिरेक्टर बनवण्यात आले आहे.

सुदर्शन वेणु:

टीव्हीएस मोटर्सचे वेणु श्रीनिवासन यांचा मुलगा सुदर्शन वेणु ने कंपनीत जॉईंट मॅनेजिंग डिरेक्टर म्हणूण जॉईन केलं आहे. सुदर्शन याला २०१५-१६ वर्षासाठी कंपनीने वार्षिक ९.५९ कोटी रूपये इतकं पॅकेज दिलं होतं. आता कंपनी त्याचं पॅकेज वाढवू शकते.

टॅग्स :व्यवसाय