Join us  

अनंत अबानीच्या प्री-वेडिंगला कोण-कोण येणार? बिल गेट्स, झुकरबर्ग ते इवांकापर्यंत अशी आहे लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 9:07 PM

Anant Ambani Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या एन्गेजमेन्ट वेळी देश-विदेशातील अनेक दिग्गज उपस्थित होते. माध्यमांतील वृत्तानुसार अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्न समारंभात सहभागी होणार असलेल्या विदेशी पाहुण्यांची यादी यावेळी मोठी असणार आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तथा रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी याच्या प्री-वेंडिग समारंभात उद्योग जगतातील बडे-बडे दिग्गज सहभागी होणार आहेत. यात, फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग, माइक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प आदींचा समावेश आहे. अनंत अंबानीचे लग्न राधिक मर्चेंटसोबत होत आहे. राधिका ही एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चेंट यांची मुलगी आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या एन्गेजमेन्ट वेळी देश-विदेशातील अनेक दिग्गज उपस्थित होते. माध्यमांतील वृत्तानुसार अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्न समारंभात सहभागी होणार असलेल्या विदेशी पाहुण्यांची यादी यावेळी मोठी असणार आहे.

हे दिग्गज होऊ शकतात सहभागी -माध्यमांतील वृत्तांनुसार, या समारंभात उद्योगपती बिल गेट्स, फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पच्यांची कन्या इवांका ट्रम्प, ब्लॅकरॉक CEO लॅरी फिंक, एडनॉक CEO सुल्तान अहमद अल जाबेर आदी सहभागी होऊ शकतात. याशिवाय, EL रोथ्सचाइल्डचे चेअरमन लिन फॉरेस्टर डी रोथ्सचाइल्ड, अॅडोबचे CEO शांतनू नारायण, टेक इन्व्हेस्टर यूरी मिलनर आणि भूतानचे राजे आणि रानी यांनाही अंबानी कुटुंबीयांकडून समारंभाचे निमंत्रण देण्यात आले आहे. एवढेच नाही, तर या समारंभात हिंदी सिने सृष्टीतीलही अनेक तारे सहभागी होताना दिसतील.

1 मार्चपासून प्री-वेडिंग समारंभाला सुरुवात -काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनची निमंत्रण पत्रीकाही समोर आली होती. यात गुजरातमधील जामनगरमध्ये 1 ते 3 मार्च 2024 दरम्यान या जोडप्याचे लग्नापूर्वीचे काही विधी पार पडतील, असे सांगण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, याच वर्षात 12 जुलै रोजी मुंबईमध्ये अनंत आणि राधिका लग्न बंधनात अडकतील, असेही बोलले जात आहे. 

टॅग्स :मुकेश अंबानीलग्नबिल गेटसइवांका ट्रम्पमार्क झुकेरबर्ग