न्यू यॉर्क: "अध्यक्ष शक्तिशाली असतात; पण, आपली राज्यघटना त्याहून अधिक शक्तिशाली आहे," या वाक्याने सोशल मीडियात प्रचंड चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी निर्णयांना लगाम घालत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने जो ऐतिहासिक निकाल दिला, त्यामागे एका भारतीय वंशाच्या वकिलाची बुद्धिमत्ता आणि जिद्द कारणीभूत आहे. नील कात्याल असे या निष्णात वकिलाचे नाव असून, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात ट्रम्प प्रशासनाचे जागतिक शुल्क बेकायदा असल्याचे सिद्ध केले व लक्षावधी छोट्या व्यावसायिकांना न्याय मिळवून दिला.
राज्यघटनेनुसार कर लावण्याचा अधिकार केवळ अमेरिकेच्या काँग्रेसला (संसद) आहे, राष्ट्राध्यक्षांना नाही, असे सप्रमाण, विविध निर्णयांचा, कायद्यातील कलमांचा दाखला देत कात्याल यांनी हा घटनात्मक पेच न्यायालयापुढे मांडला. त्यावर न्यायालयाने ६-३ असे बहुमत देत कात्याल यांचे मुद्दे मान्य केले.
नील कात्याल कोण?
नील यांचा जन्म १९७० मध्ये १ शिकागो येथे झाला. त्यांचे वडील अभियंता व आई बालरोगतज्ज्ञ होती. हे कुटुंब भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झालं होतं. नील यांनी ओबामा प्रशासनात अमेरिकेचे 'अॅटर्नी सॉलिसिटर जनरल' म्हणून काम पाहिले आहे.
त्यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत तब्बल ५४ खटल्यांमध्ये युक्तिवाद केला आहे. येल लॉ स्कूलचे पदवीधर असलेले कात्याल जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीत प्राध्यापक आहेत.
निकालानंतर नील कात्याल म्हणाले, "अमेरिकन व्यवस्थेचे हेच सौंदर्य आहे. तुम्ही जगात सामर्थ्यवान व्यक्ती असाल; पण, राज्यघटना मोडू शकत नाही."
Web Summary : Neil Katyal, an Indian-American lawyer, successfully challenged Trump's tariffs in the Supreme Court, arguing they were unconstitutional. The court sided with Katyal, affirming Congress's sole power to levy taxes. Katyal, a former Obama administration official and Georgetown professor, emphasized the constitution's supremacy.
Web Summary : भारतीय मूल के वकील नील कात्याल ने अमेरिकी सुप्रीम कोर्ट में ट्रम्प के शुल्क को चुनौती दी। कोर्ट ने कात्याल के पक्ष में फैसला सुनाया, जिसमें कहा गया कि कर लगाने का अधिकार केवल कांग्रेस को है। कात्याल ने संविधान की शक्ति पर जोर दिया।