नवी दिल्ली – देशातील प्रसिद्ध डअरी कंपनी Amul ने ग्राहकांना मोठा दिलासा देत आपल्या ७०० हून अधिक उत्पादनांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केंद्र सरकारने GST दर कपातीनंतर घेण्यात आला असून, त्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे.
केव्हापासून लागू होणार नवे दर? -GCMMF ने आपल्या निवेदनात म्हटल्यानुसार, कंपनीने लागू केलेले हे नवे दर २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील. महत्वाचे म्हणजे, तूप, लोणी, आइसक्रीम, बेकरी प्रॉडक्ट्स, फ्रोजन स्नॅक्स आदी सर्व उत्पादनांच्या दरात कपात करण्यात आली आहे.
काही प्रमुख उत्पादनांच्या किंमतीत झालेले बदल -
उत्पादन जुनी किंमत नवीन किंमत कपाततूप (1 लिटर) ₹650 ₹610 ₹40
लोणी (100 ग्रॅम) ₹62 ₹58 ₹4
प्रोसेस्ड चीज ब्लॉक (1 किलो) ₹575 ₹545 ₹30
फ्रोजन पनीर (200 ग्रॅम) ₹99 ₹95 ₹4
ही उत्पादने स्वस्त होणार -अमूलच्या या निर्णयानंतर, तूप, लोणी, दूध (UHT), आइसक्रीम, चीज, पनीर, चॉकलेट्स, बेकरी आयटम्स, फ्रोजन स्नॅक्स, कंडेन्स्ड मिल्क, पीनट स्प्रेड, माल्ट-आधारित पेयं आदींच्या किंमती कमी होतील.
ग्राहकांनाच नाही, तर शेतकर्यांनाही फायदा होईल, कंपनीचीही ग्रोथ होईल -अमुलच्या मते, या बदलाने प्रामुख्याने आइसक्रीम, चीज, लोणी आदी वस्तूंची मागमी वाढेल, कारण काही उत्पादने पूर्वी महाग होती. यामुळे कंपनीच्या विक्रीत तसेच उलाढालीतही वाढ होऊ शकते. याशिवाय, या निर्णयाचा केवळ ग्राहकांनाच नाही, तर शेतकर्यांनाही फायदा होईल. त्यांचे उत्पन्न वाढेल. तसेच कंपनीचीही ग्रोथ होईल.