वॉशिंग्टन : अमेरिकेची भारतासोबतची व्यापारी तूट २०१८ मध्ये ७ टक्क्यांनी घटून २१.३० अब्ज डॉलरवर आली आहे. अमेरिकेची विभिन्न देशांसोबतची व्यापारी तूट मात्र ६८.८० अब्ज डॉलरने वाढून ६२१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.अमेरिकेने दिलेल्या अधिकृत आकडेवारीत ही माहिती दिली आहे. अमेरिकेची भारतासोबतची व्यापारी तूट २०१७ मध्ये २२.९० अब्ज डॉलर होती. अमेरिकेच्या ‘ब्युरो आॅफ इकॉनॉमिक्स अॅनालिसिस’ या संस्थेने जारी केलेल्या आकड्यांनुसार, वस्तू व सेवा यातील अमेरिकेची व्यापारी तूट नोव्हेंबरमध्ये ५०.३० अब्ज डॉलर होती. ती डिसेंबरमध्ये वाढून ५९.८० अब्ज डॉलर झाली आहे.
अमेरिकेची भारतासोबतची व्यापारी तूट घटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 04:44 IST