Join us
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ४३ हजारांमध्ये जीवाची अमेरिका करा; एअर इंडिया कंपनीची विशेष घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 08:23 IST

अमेरिकेला जाणाऱ्या लोकांसाठी एअर इंडिया कंपनीने एका विशेष सूट योजनेची घोषणा केली.

मुंबई : अमेरिकेला जाणाऱ्या लोकांसाठी एअर इंडिया कंपनीने एका विशेष सूट योजनेची घोषणा केली असून, या अंतर्गत एकेरी प्रवासासाठी ४३ हजार रुपयांपासून तिकिटाची विक्री जाणार आहे. दि. १ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर अशा मर्यादित काळातच या तिकिटांची खरेदी ग्राहकांना करता येणार असून, दि. १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या कालावधीसाठी या तिकिटांची खरेदी करता येईल.

उपलब्ध माहितीनुसार, या योजनेंतर्गत एकेरी मार्गासाठी ४२ हजार ९९९ रुपये तर परतीचे तिकीट ५२ हजार ९९९ रुपयांना विक्री केले जाणार आहे. या खेरीज अन्य मार्गांवरील इकोनॉमी क्लासच्या एकेरी मार्गासाठी ७९ हजार ९९९ रुपये, तर परतीच्या मार्गासाठी १ लाख ९ हजार ९९९ रुपयांचे दर आकारले जाणार आहेत.

सध्या दिल्ली, मुंबई व बंगळुरू येथून न्यूयॉर्क, न्यू जर्सी, वॉशिंग्टन डीसी, शिकागो, सॅन फ्रान्सिस्को या अमेरिकेतील पाच शहरांसाठी आठवड्याला ४७ विमाने उड्डाण करतात. कंपनीच्या वेबसाइट किंवा ॲप किंवा अधिकृत ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून ग्राहकांना तिकिटाची खरेदी करता येईल.

टॅग्स :अमेरिका