Join us

43 कोटी रुपयांना मिळणार अमेरिकेचे नागरिकत्व; डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉन्च केली वेबसाइट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:30 IST

American Visa: अर्ज कसा करायचा? जाणून घ्या...

American Visa: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 5 मिलियन डॉलर्सच्या गोल्ड कार्ड EB-5 इन्व्हेस्टर व्हिसासाठी एक नवीन पोर्टल सुरू केले आहे. परदेशी नागरिकांना अमेरिकन ग्रीन कार्ड मिळवण्याचा हा एक महागडा पण सोपा मार्ग आहे. यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी trumpcard.gov ही नवीन वेबसाइट सुरू केली आहे. या वेबसाइटद्वारे, दीर्घकाळ वाट पाहणाऱ्या परदेशी नागरिकांना एका क्लिकवर अमेरिकन ग्रीन कार्ड मिळू शकते. 

गोल्ड कार्ड म्हणजे काय?गोल्ड कार्ड हा 5 मिलियन डॉलर्सचा (सुमारे 43 कोटी रुपये) इमिग्रेशन कार्यक्रम आहे. याद्वारे श्रीमंत लोकांना अमेरिकेचे कायमचे वास्तव्य मिळू शकते. पण, यामुळे त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळणार नाही, तर नागरिकत्व मिळविण्यासाठी हे पहिले पाऊल असेल.

गोल्ड कार्ड वेबसाइट सुरू करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, हा सध्याच्या EB-5 इन्व्हेस्टर व्हिसासाठी एक जलद मार्ग आहे. ट्रम्प यांनी याला ग्रीन कार्ड प्रिव्हिलेज प्लस म्हटले आहे. हे गोल्ड कार्ड गुंतवणूकदारांना जलद अमेरिकन नागरिकत्व मिळविण्याचा एक मार्ग आहे. पण, गोल्ड कार्ड धारकांना तात्काळ अमेरिकन नागरिकत्व दिले जाणार नाही. त्यांची पात्रता इत्यादी तपासल्यानंतरच त्यांना नागरिकत्व मिळविण्यास पात्र मानले जाईल.

गोल्ड कार्डसाठी अर्ज कसा करावा?

यासाठी सर्वप्रथम नवीन सुरू झालेल्या https://trumpcard.gov/ वेबसाइटला भेट द्या.

वेबसाइटवर अर्जदारांना त्यांची वैयक्तिक माहिती त्यांच्या देशाचे तपशील भरावे लागतील.

सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा.

यानंतर अर्जदारांना ई-मेलवर अर्जाची माहिती दिली जाईल. 

टॅग्स :अमेरिकाडोनाल्ड ट्रम्पगुंतवणूकव्यवसायव्हिसा