Join us  

अंबानी यांची आयुष्यभराची जेवढी कमाई, त्याहून अधिक संपत्ती इलॉन मस्क यांनी केवळ एका वर्षात कमावली!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 7:17 PM

इलॉन मस्क यांनी या वर्षात आतापर्यंत 97.8 अब्ज डॉलर कमावले आहेत. मस्क यांची एकूण संपत्ती 235 अब्ज डॉलर एवढी आहे.

 इलॉन मस्क यांच्या शिरपेचात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा तुरा उगाच रोवलेला नाही. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांच्या आयुष्यभराच्या कमाईहून अधिक संपत्ती मस्क यांनी अवघ्या एका वर्षात कमावली आहे. अंबानी यांची एकूण संपत्ती 96.2 अब्ज डॉलर एवढी आहे. तर इलॉन मस्क यांनी या वर्षात आतापर्यंत 97.8 अब्ज डॉलर कमावले आहेत. मस्क यांची एकूण संपत्ती 235 अब्ज डॉलर एवढी आहे.

अदानींच्या एकूण संपत्तीच्या जवळपास झुकरबर्ग यांची कमाई - आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, त्याच्या आयुष्यभराच्या कमाईच्या जवळपास संपत्ती मार्क झुकरबर्ग यांनी केवळ या वर्षात कमावली आहे. 2023 मध्ये आतापर्यंत झुकेरबर्ग यांनी आपल्या संपत्तीमध्ये 82.7 अब्ज डॉलरची भर घातली आहे. तर, अदानी यांची एकूण संपत्ती 84.3 अब्ज डॉलर्स आहे. ही आकडेवारी ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्समधून घेण्यात आली आहे. 128 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मार्क झुकेरबर्ग जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या स्थानावर आहेत.

आशियातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या एकूण संपत्तीपेक्षा अधिक बेजोस यांनी कमावले आहेत - या वर्षात आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या अब्जाधीशांमध्ये जेफ बेझोस तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बेझोस यांच्या संपत्तीत यावर्षी 71 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. बेझोस यांचे वार्षिक उत्पन्न देखील आशियातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या एकूण संपत्तीपेक्षा सुमारे 4 अब्ज डॉलर अधिक आहे.

चिनी अब्जाधीश झोंग शानशान हे आशियातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 67.3 अब्ज डॉलर एवढी आहे आणि ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 20 व्या स्थानावर आहेत. बेझोस यांची एकूण संपत्ती 178 अब्ज डॉलर एवढी आहे. ते श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. 

टॅग्स :एलन रीव्ह मस्कमुकेश अंबानीगौतम अदानीमार्क झुकेरबर्ग