Join us

तुमच्या आवडत्या MX Player ची विक्री; Amazon Prime ने ₹830 कोटींमध्ये केला करार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 18:05 IST

भारतातील लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म MX Player आर्थिक अडचणीचा सामना करत आहे.

Amazon to buy MX Player : भारतात OTT प्लॅटफॉर्म्सची सुरुवात झाल्यानंतर चित्रपट आणि वेब सीरिजला 'अच्छे दिन' आले. प्रेक्षकांनाही ओटीटीवर चांगला कंटेट पाहायला मिळू लागला. यामध्ये टाइम्स इंटरनेटच्या MX Player ने जोरदार सुरुवात केली. MX Player ने सुरुवातीला मोफत आणि नंतर अतिशय माफक दरात चांगला कंटेट देण्यास सुरुवात केली. पण, सध्या कंपनी आर्थिक अडचणीचा सामना करत आहे. त्यामुळेच ही कंपनी विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, MX Player प्लॅटफॉर्मवर सध्या 2500 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळेच विकण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतातील लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime ने  MX Player खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून टाईम्स इंटरनेट आणि ॲमेझॉन प्राइममध्ये याबाबत चर्चा सुरू होती. याबाबतचा अंतिम करार झाला असून, लवकरच दोन्ही कंपन्या त्याची घोषणा करतील. ₹ 830 कोटी ($100 मिलियन) मध्ये हा सौदा झाल्याची माहिती आहे. 

MX Player चा आर्थिक वर्ष 2023 चा अहवाल सार्वजनिक झालेला नाही, पण 2022 मध्ये कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागले. एका रिपोर्टनुसार, Times Internet काही काळापासून आपल्या मालमत्ता विकत आहे. गेल्या वर्षी त्यांनी MX Takatak, Dineout, MensXP, iDiva आणि Hypp विकले आहे.

अशी झाली MX Player ची सुरुवातएका दक्षिण कोरियाच्या कंपनीने MX Player मीडिया प्लेयर ॲप म्हणून लॉन्च केले होते. Times Internet ने 2018 मध्ये ₹1,000 कोटी ($140 Mn) मध्ये विकत ते विकत घेतले. टाइम्स इंटरनेटने स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्हणून याची रिलॉन्चिंग केली. करोडो लोकांनी आधीपासूनच एमएस प्लेअर डाउनलोड केले होतो, त्याचा टाईम्स इंटरनेटला फायदा झाला. पण, नंतर हळुहळू कंपनी तोट्यात जाऊ लागली. त्यामुळेच अखेर कंपनीने हे प्लॅटफॉर्म विकण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :व्यवसायगुंतवणूकअ‍ॅमेझॉन