झेप्टो, ब्लिंकीट सारखी १० मिनिटांत तुम्हाला हवी असलेली वस्तू घरपोच देण्याची सेवा आता अॅमेझॉननेही सुरु केली आहे. बंगळुरू, दिल्लीनंतर आता महाराष्ट्रात मुंबईत सुरु करण्यात आली आहे. किराना, पर्सनल केयर प्रोडक्ट्स आणि इलेक्ट्रॉनिक एक्सेसरीज या द्वारे डिलिव्हर केली जाणार आहेत. अॅमेझॉनने मागविल्याच्या तासा-दोन तासांत मोबाईल सारखी उत्पादने डिलिव्हर करण्याचे काम काही वर्षांपूर्वी सुरु केले होते, परंतू ते नंतर बंद पडले होते. आता इतर कंपन्यांच्या यशानंतर अॅमेझॉन पुन्हा एकदा या क्षेत्रात हात आजमावून पाहत आहे.
Amazon Now ची सुरुवात याच वर्षी बंगळुरूत करण्यात आली होती. आता ती मुंबईतील काही भागात सुरु करण्यात आली आहे. तीन शहरांमध्ये १०० हून अधिक Amazon Now मायक्रो-फुलफिलमेंट सेंटर्स उभारण्यात आले आहेत. ऑर्डर व्हॉल्यूम दरमहा २५ टक्क्यांनी वाढत असल्याचा कंपनीने दावा केला आहे.
आपल्या भागात ही सेवा सुरु आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही Amazon.in किंवा अॅपवर जाऊन बॅनरवर १० मिनिटांत सेवा असे आलेय का पाहू शकता. ते आलेले असेल तर तुमच्या भागात ही सेवा उपलब्ध आहे. क्विक कॉमर्समध्ये झेप्टो, स्विगी इन्स्टामार्ट आणि ब्लिंकिट यांनी आधीच आपले हात-पाय पसरलेले आहेत. टाटाची बीबी नाऊ आणि फ्लिपकार्टची मिनिट्स सेवा देखील यात उतरलेली आहे. यामुळे आता या क्षेत्रात स्पर्धा तीव्र होणार आहे.