Join us
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅमेझॉनवर 20 जानेवारीपासून 'Great Republic Day Sale', अवघ्या 99 रुपयांत करा शॉपिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 16:07 IST

Great Republic Day Sale : अ‍ॅमेझॉन कंपनीने सेलची टॅगलाइन New Beginnings, New Savings अशी ठेवली आहे.

ठळक मुद्देअ‍ॅमेझॉनवर डेली एसेन्शियलची (Daily Essentials) 40,000+ हून अधिक उत्पादने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

नवी दिल्ली : सोशल मीडियातील ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनवर Great Republic Day Sale ची घोषणा झाली आहे. हा सेल 20 जानेवारीपासून सुरु होणार आहे, तर 23 जानेवारीला संपणार आहे. अ‍ॅमेझॉन कंपनीने सेलची टॅगलाइन New Beginnings, New Savings अशी ठेवली आहे.

अ‍ॅमेझॉनवर सेलसाठी एक मायक्रो पेज तयार केले आहे, या पेजवर सेलसंबंधी काही माहिती मिळाली आहे. यानुसार, अ‍ॅमेझॉनच्या प्राइम मेंबर्संसाठी हा रिपब्लिक डे सेल 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. सेलसाठी अ‍ॅमेझॉनने एसबीआयसोबत भागीदारी केली आहे, त्याअंतर्गत एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरल्यास 10% ची त्वरित सूट मिळणार आहे.

अ‍ॅमेझॉनवर डेली एसेन्शियलची (Daily Essentials) 40,000+ हून अधिक उत्पादने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या कॅटेगरीत ग्राहक 99 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीपासून खरेदी करू शकतात. याशिवाय, अ‍ॅमेझॉनवर टॉप ब्रँड्सचे 1,000 हून अधिक फॅशन प्रोडक्ट ऑफर करण्यात आले आहेत. येथून ग्राहक 80% सवलतीत खरेदी करू शकतात.

सेलमध्ये स्मार्टफोन आणि अ‍ॅक्सेसरीज सुद्धा कमी किंमतीत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या कॅटेगरीतील बेस्ट सेलर आणि लेटेस्ट लाँच स्मार्टफोन 4,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीपासून खरेदी करता येऊ शकेल. त्याशिवाय 12 महिन्यांसाठी नो कॉस्ट ईएमआयचा (No Cost EMI) पर्याय देखील दिला जात आहे, त्याची सुरुवातीची किंमत दरमहा 2,083 रुपये आहे.

याचबरोबर, सेलमध्ये किचन आणि होम प्रोडट्सची सुरुवात 79 रुपयांपासून आहे. 79 रुपयांत तुम्ही एखादे होम प्रोडक्ट्स खरेदी करू शकता. येथे किचन आणि होम अप्लायंस् ला 399 रुपयांची सुरुवातीची किंमत आहे. तर Cookware & dining च्या वस्तू 149 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर उपलब्ध केल्या जात आहेत.

या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि अ‍ॅक्सेसरीजचे 4,000 हून अधिक प्रोडक्ट्स देण्यात आली आहेत. येथील वस्तू 199 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर खरेदी करता येतील. तसेच, पुस्तके, खेळणी, गेमिंग यासारख्या वस्तूंवर 70% सूट दिली जात आहे.

टॅग्स :अ‍ॅमेझॉनव्यवसायतंत्रज्ञानविक्री