Join us

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टला ५ हजार कोटींचा फटका?; एफडीआय धोरणात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 00:56 IST

ई-कॉमर्समध्ये थेट विदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) धोरणात बदलामुळे अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यासारख्या दिग्गज कंपन्यांना मोठा फटका बसणार आहे.

नवी दिल्ली : ई-कॉमर्समध्ये थेट विदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) धोरणात बदलामुळे अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यासारख्या दिग्गज कंपन्यांना मोठा फटका बसणार आहे. कारण, या दोन्ही कंपन्यांकडे २ ते २.५ हजार कोटी रुपयांचा वस्तूंचा साठा आहे.१ फेब्रुवारीपूर्वी वस्तूंचे हे विशाल भंडार कसे संपवावे हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. कारण, नव्या धोरणात स्पष्ट म्हटले आहे की, एखाद्या विक्रेत्याची ई-कॉमर्स कंपनी अथवा त्यांच्या ग्रुप कंपनीसोबत भागीदारी असेल, तर त्या विक्रेत्याला या ई-कॉमर्स कंपनीच्या प्लॅटफॉर्मवरून आपल्या वस्तू विक्री करता येणार नाहीत.ई-कॉमर्स कंपन्या फॅशन, अ‍ॅक्सेसरीज आणि आपल्या टाय अप ब्रॅण्डच्या प्रॉडक्टचा तीन महिन्यांचा साठा करून ठेवते. अ‍ॅमेझॉनसाठी क्लाऊडटेल आणि फ्लिपकार्टसाठी रिटेलनेट हेच काम करतात.या दोन्ही कंपन्या छोट्या-मोठ्या ब्रॅण्डसकडून प्रॉडक्टस् खरेदी करतात. ते ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून आॅनलाईन विक्री केले जाते. एका फॅशन ब्रॅण्डच्या सीईओंनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टकडे जवळपास ५ हजार कोटी रुपयांचा साठा पडून आहे.एका महिन्यात करणार साठा रिकामाउद्योग-व्यवसायातील सूत्रांनी सांगितले की, विक्रीच्या भागीदारीत क्रमश: फ्लिपकार्ट, मिंट्रा आणि अ‍ॅमेझॉन या कंपन्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसºया क्रमांकावर आहेत.आता या तिन्ही कंपन्यांचे अधिकारी एका महिन्याच्या आत आपला साठा रिकामा करण्याच्या पर्यायावर विचार करीत आहेत.क्लाऊडटेल आणि रिटेलनेटसारखे विक्रेते आपल्या साठ्याबाबत विविध ब्रॅण्डशी चर्चा करीत आहेत.- दोन्ही कंपन्यांच्या तीन मोठ्या बिझनेसमध्ये फॅशन आणि सॉफ्ट लाईन कॅटेगरीज यांचा समावेश आहे.- च्नुकत्याच झालेल्या सणासुदीत या वर्गातील वस्तूंची विक्री २,५०० ते २,८०० कोटी रुपयांची राहिली आहे.

 

टॅग्स :फ्लिपकार्टअॅमेझॉन