Join us

अमेझॉन कंपनी विकत घेणार बिग बाजारचे ९.५०% समभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 05:21 IST

जगभर आॅनलाईन विक्री करणारी अमेझॉन भारतातील बिग बाजारचे संचालन करणाऱ्या μयूचर रिटेलचे ९.५० टक्के समभाग विकत घेणार आहे.

मुंबई: जगभर आॅनलाईन विक्री करणारी अमेझॉन भारतातील बिग बाजारचे संचालन करणाऱ्या μयूचर रिटेलचे ९.५० टक्के समभाग विकत घेणार आहे. ही गुंतवणूक जवळपास २५०० कोटींची असेल, अशी माहिती बिग बाजारच्या सूत्रांनी दिली.गेल्या अनेक महिन्यांपासून बिग बाजारमध्ये अमेझॉन गुंतवणूक करणार अशी कुणकुण होती. परंतु μयूचर रिटेलचे पदाधिकारी मात्र त्यावर भाष्य करण्यास टाळाटाळ करत होते. पण आता ही बातमी खरी होती हे सिद्ध झाले आहे. अमेझॉन ही गुंतवणूक फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर (एफपीआय) म्हणून करणार आहे. एफपीओ गुंतवणूकदाराला कुठल्याही भारतीय कंपनीचे जास्तीत जास्त १० टक्के समभाग विकत घेता येतात परंतु भारतीय कंपनीला मात्र आपले ४९ टक्केपर्यंत समभाग अनेक विदेश गुंतवणूकदारांना विकण्याची मुभाअसते. याच योजनेचा उपयोग करून,अमेझॉन ही गुंतवणूक करणारबिग बाजारचे जवळपास ११०० स्टोअर्स भारतभर कार्यरत आहेत व μयूचर रिटेल ही कंपनी भारतात किरकोळ विक्री करणारी सर्वात मोठी कंपनी समजलीजाते. यापूर्वी एफपीआय म्हणूनअमेझॉनने आदित्य बिर्ला समूहाच्या मोअर सुपरमार्केटस व शॉपर्स स्टॉप या फॅशनेबल तयार कपडे विकणाºया कंपनीत गुंतवणूक केली आहे

टॅग्स :अॅमेझॉनव्यवसाय