IPO News Updates: अमागी मीडिया लॅब्स लिमिटेड (Amagi Media Labs Ltd) या १७ वर्ष जुन्या कंपनीनं आयपीओसाठी अर्ज केला आहे. कंपनीनं सेबीकडे डीआरएचपी दाखल केलाय. हा आयपीओ नवीन शेअर्स आणि ऑफर्स फॉर सेल या दोन्हींवर आधारित असेल, असं कंपनीनं एका निवेदनात म्हटलंय. दाखल करण्यात आलेल्या डीआरएचपीनुसार, १०२० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आणि ३.४१ कोटी शेअर्स सध्याच्या शेअरहोल्डर्सच्या विक्रीनंकर जारी केले जतील.
कंपनी निधी उभारण्यासाठी BRLM शी देखील संपर्कात आहे. कंपनी प्री-आयपीओद्वारे २०४ कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. जर कंपनी असं करण्यात यशस्वी झाली, तर नवीन इश्यूची साईज कमी केली जाऊ शकते.
पैशांचा वापर कुठे करणार?
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, ६६७ कोटी रुपये गोळा केलेल्या नवीन इश्यूचा वापर कंपनी तंत्रज्ञान आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरसाठी करेल. त्याचबरोबर उरलेले पैसे कंपनीच्या सामान्य कॉर्पोरेट कामात आणि कंपनीच्या वाढीसाठी वापरेल.
कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे?
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये अमागीचा महसूल (ऑपरेशन्स) ११६२ कोटी रुपये होता. ज्यात आर्थिक वर्ष २०२३ ते २०२५ या कालावधीत ३०.७० सीएजीआरनं वाढ झाली आहे. कंपनीचा एबिटडा २.०२ टक्के होता. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये तो १७.६९ टक्के आणि २०२४ मध्ये २०.६२ टक्के होता.
आयपीओसाठी कंपनीनं कोटक महिंद्रा कॅपिटल, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, गोल्डमन सॅक्स इंडिया सिक्युरिटीज, आयआयएफएल कॅपिटल आणि एव्हेंडस कॅपिटल यांची बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीची लिस्टिंग बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी प्रस्तावित आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)