जर्मनीची मोठी विमा कंपनी अलायन्झ आणि मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसनं एक मोठा निर्णय घेतला आहे. एकत्रितपणे, ते भारतीय विमा बाजारात प्रवेश करणार आहेत. यासाठी, दोन्ही कंपन्यांनी ५०:५० भागीदारीसह संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे. यासोबतच, दोघांनीही जीवन विमा आणि सामान्य विम्यात एकत्र काम करण्यासाठी करार केलाय. दरम्यान, हा फक्त एक प्रारंभिक करार आहे आणि त्यावर पुढे चर्चा केली जाईल. बजाज फिनसर्व्हसोबतची २० वर्षांची भागीदारी संपवल्यानंतर चार महिन्यांनी अलायन्झनं हे पाऊल उचललं आहे.
भारतातील रिइन्शुरन्स बाजारपेठ सध्या फक्त काही कंपन्यांपुरती मर्यादित आहे. रिइन्शुरन्स म्हणजे विमा कंपन्यांचा विमा दिलेला करणं. या क्षेत्रातील भारतातील एकमेव सरकारी कंपनी जीआयसी आरई आहे. म्युनिक रे, स्विस रे आणि एससीओआर एसई सारख्या मोठ्या परदेशी कंपन्या देखील येथे कार्यरत आहेत, परंतु त्या त्यांच्या शाखांद्वारे काम करतात. अलायन्झ आणि जेएफएसएल भारतातच एक कंपनी स्थापन करून काम करू इच्छितात. यामुळे त्यांना भारताच्या विमा नियम आणि बाजारपेठेशी अधिक चांगल्या प्रकारे जोडल्या जातील.
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
Allianz चा प्लान
गेल्या वर्षीच जिओ फिन रिलायन्स इंडस्ट्रीजपासून वेगळी झाली. ही कंपनी वेगानं आर्थिक सेवा देणारी कंपनी बनत आहे. ही कंपनी कर्ज, पेमेंट, लीजिंग आणि विमा ब्रोकरेज सारखी कामं करत आहे. याशिवाय, जिओ फिननं जगातील सर्वात मोठी असेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकरॉकच्या सहकार्यानं असेट आणि वेल्थ मॅनेजमेंटचं काम देखील सुरू केलं आहे. अलायन्झसोबतच्या या नवीन करारामुळे जिओ फिनला आर्थिक सेवांचे संपूर्ण पॅकेज देण्यास मदत होईल.
किती मोठी बाजारपेठ?
जर हा करार झाला तर तो भारतातील रिइन्शुरन्स क्षेत्रात एक मोठं पाऊल असेल. भारत हा जगातील दहावा सर्वात मोठा विमा बाजार आहे. भारतातील विमा बाजार आणखी वेगाने वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे. आर्थिक वर्ष २५ मध्ये, जीवन विमा प्रीमियम ८.७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होता, तर बिगर-जीवन विमा सुमारे ३.१ लाख कोटी रुपये होता. बिगर जीवन विम्यामध्ये कार, घर आणि आरोग्य विमा यासारख्या गोष्टींचा समावेश होतो.