Join us

अक्षय तृतीयेला वाढली सोन्याची झळाळी, गतवर्षीपेक्षा २० टक्के जास्त खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 07:04 IST

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी झाली. गतवर्षीच्या तुलनेत २० ते २५ टक्के अधिक सोने खरेदी करण्यात आली. जळगावमध्ये तब्बल १० ते १२ कोटी रुपयांची उलाढाल झाली.

- खलील गिरकरमुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी झाली. गतवर्षीच्या तुलनेत २० ते २५ टक्के अधिक सोने खरेदी करण्यात आली. जळगावमध्ये तब्बल १० ते १२ कोटी रुपयांची उलाढाल झाली. गृह खरेदी व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारपेठेतही मोठी उलाढाल झाली.इंडिया बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे (आयबीजेए) सचिव सुरेंद्र मेहता म्हणाले की, एकूण सोने खरेदीपैकी सुमारे २५ टक्के सोन्याच्या नाण्यांची तर ७५ टक्के खरेदी सोन्याच्या दागिन्यांची करण्यात आली. यंदा सोने, चांदीसोबत हिऱ्यांच्या खरेदीलाही प्रतिसाद मिळाल्याचे व्यापारी हार्दिक हुंडिया यांनी सांगितले.घरखरेदीत २० ते २५ टक्के वाढअक्षय तृतीया रिअल इस्टेट क्षेत्रासाठीही लाभदायी ठरल्याचे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजन बांदेलकर यांनी सांगितले. नेहमीच्या तुलनेत आज घरखरेदीत २० ते २५ टक्के वाढ झाली, असे ते म्हणाले. जळगावलाला अक्षय तृतीयेनिमित्त सोनेखरेदीचा प्रचंड उत्साह होता. अनेक महिला व तरुणी सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी सराफांच्या दुकानात आल्या होत्या. सोन्याचा भाव आज प्रति तोळा १०० रुपये कमी होऊन ३२,१०० रुपयांवर आला. चांदीचा भाव मंगळवारी किलोला३९ हजार रुपये होता. 

टॅग्स :अक्षय तृतीया