Join us

अकासा एअरचं पहिलं विमान आकाशात झेपावलं; अवघ्या २ हजारांत करू शकता हवाई सफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 16:24 IST

अकासा एअर बुधवारी वगळता प्रत्येक दिवशी मुंबई आणि अहमदाबाद या मार्गावर सुविधा देईल.

मुंबई - शेअर बाजारातील बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेली अकासा एअरचं पहिलं विमानं रविवारी सकाळी १०.०५ मिनिटांनी मुंबईहून अहमदाबादसाठी रवाना झालं. नागरी हवाई वाहतूक उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी अकासाच्या पहिल्या व्यावसायिक विमानाला हिरवा झेंडा दाखवला. सकाळी ११.२५ ला ही फ्लाईट अहमदाबाद येथे पोहचली. या विमानात १८९ पॅसेंजरसह कॉकपिट आणि केबिन क्रू मेंबर्सही होते. 

अकासा एअर १३ ऑगस्टला बंगळुरु कोच्ची, १९ ऑगस्टला बंगळुरू-मुंबई आणि १५ सप्टेंबरला चेन्नई-मुंबई या मार्गावर उड्डाण घेईल. या विमानाचं किमान भाडे १९१६ रुपये इतके असेल. अकासानं स्वस्त दरात हवाई सफर म्हणून पुढे आणलं आहे. स्पाइसजेट, इंडिगो, गो फर्स्टसारख्या कंपन्यांसोबत अकासा एअरची टक्कर असेल. राकेश झुनझुनवाला यांचे या कंपनीत ४० टक्के भागीदारी आणि ३५ मिलियन डॉलरची गुंतवणूक आहे. 

अकासा एअर बुधवारी वगळता प्रत्येक दिवशी मुंबई आणि अहमदाबाद या मार्गावर सुविधा देईल. मुंबईहून सकाळी १०.०५ वाजता हे विमान उड्डाण घेईल. तसेच अहमदाबादहून पुन्हा येण्यासाठी दुपारी १५.०५ ही वेळ असेल. मुंबईहून फ्लाईटचं तिकीट २६७३ रुपयापासून सुरू होईल तर अहमदाबादवरून फ्लाईट तिकीट २५७४ रुपये इतके असेल. मुंबई अहमदाबाद दुसरी फ्लाईट दुपारी २.०५ मिनिटांची असेल तर अहमदाबादहून पुन्हा येण्यासाठी संध्याकाळी ४.०५ चं विमान असेल. 

अकासा एअरलायन बंगळुरुहून कोच्ची सकाळी ७.१५ आणि ११ वाजता विमान उड्डाण होईल. या विमानाचं तिकीट १९१६ रुपये असेल. कोच्चीहून परतण्यासाठी सकाळी ९.०५ आणि दुपारी १.१० वाजता विमानसेवा असेल. या विमानाचे दर २४८१ रुपयापासून सुरू होतील. Akasa २०२३ च्या उन्हाळ्यात आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करेल. तोपर्यंत त्यात २० विमानांचा समावेश असेल, जे परदेशी मार्गांवर सेवेसाठी स्थानिक नियमांनुसार आवश्यक आहेत. अकासा ७३७ मॅक्समध्ये मध्य पूर्व, दक्षिणपूर्व आशिया, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथे उड्डाण करण्याचा पर्याय असेल.

फ्लाइट बुकिंग मोबाइल APP, मोबाइल वेब आणि डेस्कटॉप वेबसाइट www.akasaair.com ट्रॅव्हल एजंटद्वारे करता येते. एअरलाइनकडे ऑन-बोर्ड जेवण सेवा देखील आहे जी कॅफे अकासा येथून बुक केली जाऊ शकते. कॅफे अकासा पास्ता, व्हिएतनामी राइस रोल्स, हॉट चॉकलेट आणि भारतीय जेवण यासारख्या गोष्टी ऑफर आहेत. 

टॅग्स :राकेश झुनझुनवाला