Join us

एअरटेलचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन; एका वर्षासाठी मिळणार अनलिमिटेड बेनिफिट्स, काय-काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:48 IST

airtel recharge : एअरटेलकडेही त्यांच्या वापरकर्त्यांसाठी खूप महागडे रिचार्ज प्लॅन आहेत. पण, याचे फायदे माहिती आहे का?

airtel recharge : जिओनंतरएअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशभरात सर्वाधिक मोबाईल युजर्स एअरटेलशी जोडले गेले आहेत. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी कमी किमतीच्या रिचार्ज प्लॅनपासून ते महागड्या रिचार्ज प्लॅनपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध करून देते. जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल, तर कंपनीच्या सर्वात महागड्या प्लॅनबद्दलची ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

एअरटेलचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन ३,९९९ रुपयांमध्ये येतो. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया.

  • एअरटेलच्या ३,९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये काय मिळते?
  • एअरटेलचा हा प्लॅन तब्बल ३६५ दिवसांच्या म्हणजेच एका वर्षाच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि दररोज २.५ जीबी डेटाचा लाभ मिळतो. याशिवाय, तुम्हाला रोज १०० मोफत एसएमएसचा लाभही मिळतो.

वाचा - रणबीर कपूरशी संबंधित 'या' कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी; ब्लॉक डीलनंतर शेअरने गाठले अप्पर सर्किट

अतिरिक्त फायदे आणि अनलिमिटेड ५जी डेटाएअरटेलच्या ३,९९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना एका वर्षासाठी डिस्नी+हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळते. सोबतच, अनलिमिटेड ५जी डेटा आणि एअरटेल एक्सस्ट्रीमचाही फायदा मिळतो. यामुळे, जर तुम्हाला लांबच्या वैधतेसाठी अनलिमिटेड बेनिफिट्स हवे असतील, तर हा प्लॅन एक चांगला पर्याय आहे.

टॅग्स :एअरटेलजिओस्मार्टफोन