Join us

Airtel चा सर्वात स्वस्त Postpaid प्लॅन, अनलिमिटेड कॉल्स आणि डेटा बेनिफिट्ससह बरंच काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 21:10 IST

जर तुम्ही एअरटेलच्या सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनच्या शोधात असाल, तर कंपनी ५०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे दोन पोस्टपेड प्लॅन्स ऑफर करत आहे.

एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड असे दोन्ही प्लॅन्स मिळतात. प्रीपेड युझर्सच्या प्लॅन्सची अनेकदा चर्चा होताना दिसते, परंतु पोस्टपेड प्लॅन्सबाबत तसं होताना दिसत नाही. दूरसंचार कंपन्या अनेक प्लॅन्स ऑफर करतात. यामध्ये सिंगल युझर किंवा संपूर्ण फॅमिलासाठीही पर्याय उपलब्ध असतो.

एअरटेल असेच काही प्लॅन्स ऑफर करत आहे. फॅमिली प्लॅनमध्ये अनेक युझर्स या प्लॅनचा फायदा घेऊ शकतात. तर सिंगल युझर्ससाठीही काही पोस्टपेड प्लॅन्स आहेत. जाणून घेऊया या प्लॅन्सबाबत. पाहूया यात कोणते फायदे मिळतात.

एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वात स्वस्त असलेला पोस्टपेड प्लॅन हा 399 रूपयांचा आहे. यामध्यो लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्ससह डेटा आणि अन्य बेनिफिट्सही मिळतात. तसंच यात 40 जीबी डेटा ऑफर केला जातो. हा रोलओव्हर बेनिफिट्ससह मिळतो. शिवाय या प्लॅनमध्ये  100 एसएमएसदेखील मिळतात. कंपनी या प्लॅनसह एअरटेल थँक्स रिवॉर्डही ऑफर करते. युझर्सना 200 जीबी पर्यंत डेटा रोलओव्हरचा फायदा घेता येतो.

दरम्यान, कंपनी 500 रूपयांपेक्षा कमी किंमतीचाही प्लॅनही ऑफर करत आहे. यामध्ये ओटीटी सबस्क्रिप्शनही देण्यात येतं. हा प्लॅन 499 रूपयांचा असून त्यात  अनलिमिटेड वॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय 75 जीबी डेटा, डेटा रोलओव्हर, 100 एसएमएस, अॅमेझॉन प्राईम सबस्क्रिप्शन, डिस्ने प्लस हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन आणि एअरटेल थँक्स रिवॉर्डही ऑफर केले जातात.

टॅग्स :एअरटेल