Airtel Plans: टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी भारती एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी कमी किमतीत दीर्घ वैधतेचे रिचार्ज प्लान्स देत आहे. कंपनीने अलीकडेच 365 दिवसांची वैधता असलेले काही किफायतशीर प्लान्स सादर केले असून, त्यात अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि इतर अतिरिक्त फायदे मिळतात.
एअरटेलच्या ग्राहकसंख्येत मोठी वाढ
TRAI (टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया) च्या ताज्या अहवालानुसार, डिसेंबर महिन्यात एअरटेलने 54.2 लाख नवे ग्राहक आपल्या नेटवर्कमध्ये जोडले आहेत. ही संख्या इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत दुप्पटपेक्षा अधिक आहे. यामुळे एअरटेलची एकूण ग्राहकसंख्या 46.33 कोटींच्या पुढे गेली आहे. वाढत्या ग्राहकसंख्येला धरून कंपनी किफायतशीर आणि दीर्घकालीन रिचार्ज प्लान्सवर भर देत आहे.
₹2249 चा रिचार्ज प्लान...
एअरटेलचा ₹2249 किंमतीचा हा प्लान स्मार्टफोन युजर्ससाठी आहे. या प्लानची वैधता 365 दिवस (पूर्ण एक वर्ष) असून, यात संपूर्ण भारतात अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, फ्री नॅशनल रोमिंग, 3,600 मोफत SMS आणि एकूण 30GB डेटा मिळतो. याशिवाय, 1 वर्षासाठी Adobe Express Premium चे सबस्क्रिप्शनदेखील मोफत मिळते.
₹1798 चा प्लान
2G फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठीही एअरटेलने एक स्वस्त दीर्घ वैधतेचा प्लान उपलब्ध करून दिला आहे. या प्लानची वैधतादेखील 365 दिवस असून, यात संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग, फ्री नॅशनल रोमिंग, 3,600 मोफत SMS आणि 1 वर्षासाठी Adobe Express Premium सबस्क्रिप्शन मोफत मिळते. मात्र, या प्लानमध्ये तुम्हाला डेटा मिळत नाही. गरज असल्यास डेटा अॅड-ऑन पॅक घेता येईल. हा प्लान TRAI च्या आदेशानंतर एअरटेलने मागील वर्षी सादर केला होता.
फ्रॉड अलर्ट सुविधेची सुरुवात
दरम्यान, स्पॅम आणि ऑनलाइन फसवणूकीच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी एअरटेलने आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून ‘फ्रॉड अलर्ट’ ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवी अत्याधुनिक सुविधा सुरु केली आहे. ‘फ्रॉड अलर्ट’ ही नाविन्यपूर्ण प्रणाली ग्राहकांच्या वन-टाइम पासवर्ड संबंधित बँक फसवणूकींपासून तत्काळ प्रभावीपणे संरक्षण देते. ही प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असल्याने संशयास्पद व्यवहार ओळखते. फसवणुकीचे व्यवहार होण्याची शक्यता असल्यास ही प्रणाली तत्काळ ग्राहकांना संबंधित व्यवहाराबद्दल माहिती देते. त्यामुळे ग्राहक ऑनलाइन फसवणुकीच्या व्यवहारातून पूर्णपणे सुरक्षित झाले असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आलाय.
Web Summary : Airtel's affordable annual plans offer long validity, unlimited calling, and data. Airtel added 54.2 lakh new subscribers in December. Plans include ₹2249 with 30GB data and ₹1798 for 2G users. Airtel also launched 'Fraud Alert' for security.
Web Summary : एयरटेल के किफायती वार्षिक प्लान लंबी वैधता, अनलिमिटेड कॉलिंग और डेटा प्रदान करते हैं। दिसंबर में एयरटेल ने 54.2 लाख नए ग्राहक जोड़े। प्लान में ₹2249 में 30GB डेटा और 2G यूजर्स के लिए ₹1798 का प्लान शामिल है। एयरटेल ने सुरक्षा के लिए 'फ्रॉड अलर्ट' भी लॉन्च किया।