भारती एअरटेल कंपनीने या वर्षी म्हणजेच २०२५-२६ च्या तिमाहीत जिओला मागे टाकले आहे. या तिमाहीमध्ये कंपनीने ५९४८ रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मागच्या वर्षीपेक्षा हा नफा ३४ टक्क्यांनी जास्त आहे.
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
एअरटेलचा एकत्रित महसूलही मोठ्या वाढीसह ४९,४६३ कोटींवर पोहोचला आहे. एक वर्षापूर्वी, जून २०२४ च्या तिमाहीत, हा आकडा ३८,५०६ कोटी होता. त्यानुसार, वार्षिक आधारावर महसुलात २८% वाढ झाली आहे. फक्त वार्षिकच नाही तर कंपनीचे निकाल तिमाही-दर-तिमाही आधारावरही चांगले राहिले आहेत. जानेवारी-मार्च २०२५ च्या तिमाहीच्या तुलनेत यावेळी महसुलात ३.३% वाढ झाली आहे.
एअरटेलचा दबदबा
यावेळी एअरटेलने टेलिकॉम क्षेत्रात नफ्याच्या बाबतीत चांगली वाढ दर्शविली आहे. एप्रिल ते जून २०२५ या तिमाहीत एअरटेलने ५,९४८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे, हा नफा गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ४,१५९ कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा ४३% जास्त आहे.
जिओचा या तिमाहीत कंपनीचा नफा ३२४.६६ कोटी रुपयांचा होता. गेल्या वर्षी याच कालावधीत जिओला ३१२.६३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. म्हणजेच जिओचा नफा थोडा वाढला आहे. आकडेवारीची तुलना केली तर यावेळी एअरटेलने नफ्यात जिओला सुमारे १८.३ पट मागे टाकल्याचे दिसत आहे.
कमाईतही एअरटेलचा नंबर पहिला
भारती एअरटेलने या तिमाहीत उत्पन्नाच्या बाबतीतही जबरदस्त कामगिरी केली आहे. एप्रिल-जून २०२५ दरम्यान, कंपनीने व्यवसायातून ४९,४६३ कोटींचा महसूल मिळवला. गेल्या वर्षी याच कालावधीत मिळालेल्या ३८,५०६ कोटींपेक्षा हे २८% जास्त आहे. तिमाही-दर-तिमाही आधारावर, कंपनीच्या उत्पन्नातही ३.३% वाढ झाली आहे.
या तिमाहीत जिओ फायनान्शियलचा महसूल ६१२.४६ कोटींवर पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या ४१७.८२ कोटींच्या तुलनेत ही ४६.६% वाढ आहे. टक्केवारीच्या बाबतीत जिओची वाढ निश्चितच वेगवान आहे.