Join us
Daily Top 2Weekly Top 5

एअरटेलला १३४१ कोटींचा नफा, प्रत्येक ग्राहकामागील कमाईदेखील वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 15:29 IST

देशातील दुसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी भारती एअरटेलनं चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत उत्तम नफा झालाय.

देशातील दुसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी भारती एअरटेलनं चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 1341 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात 37 टक्क्यांनी घट झाली आहे. एअरटेलला गेल्या वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत 2145.2 कोटी रुपयांचा नफा झाला होता. एअरटेलचे शेअर्स मंगळवारी 1 टक्क्यांपेक्षा जास्त घसरून 914.20 रुपयांवर बंद झाले.एअरटेलची प्रति युझर कमाई (प्रति युझर सरासरी महसूल किंवा ARPU) चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत वाढून 203 रुपये झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत 190 रुपये होती. हाय व्हॅल्यू कस्टमर्स मिळवण्यावर सतत लक्ष केंद्रित केल्यामुळे आणि उत्तम रियलायझेशन्समुळे त्यात वाढ झाली आहे. वार्षिक आधारावर सप्टेंबर 2023 तिमाहीत कंन्सॉलिडेटेड  EBITDA मध्ये 11 टक्के वाढ झाली आहे आणि ती 19665 कोटी रुपये आहे.37044 कोटी झाला महसूलचालू आर्थिक वर्षाच्या जुलै सप्टेंबर तिमाहीत एअरटेलचा महसूल 7 टक्क्यांनी वाढून 37044 कोटी रुपये झालाय. गेल्या वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा महसूल 34,527 कोटी रुपये होता. कंपनीच्या भारतीय व्यवसायाचा तिमाही महसूल 11 टक्क्यांनी वाढून 26995 कोटी रुपये झाला. तर मोबाइल सर्व्हिसेसचा महसूलही 11 टक्क्यांनी वाढला.

टॅग्स :एअरटेल