एअरटेल ही देशातील एक नावाजलेली टेलिकॉम कंपनी आहे जी आपल्या युजर्सना वेगवेगळे प्लान्स ऑफर करत आहे. आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवा इंटरनॅशनल रोमिंग प्लान लाँच केला आहे. या प्लानमुळे परदेशात जाणाऱ्यांना खूप सोपं होणार आहे. या अंतर्गत १८९ देशांमध्ये राहणाऱ्या युजर्संना अनलिमिटेड हाय स्पीड डेटा मिळणारे. हा प्लान भारतात आणि भारताबाहेर वापरता येईल. चला तर मग जाणून घेऊ.
Airtel चा IR प्लान
या नव्या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड डेटा मिळणार असून परदेशात उतरताच तो आपोआप अॅक्टिव्हेट होईल. विमानातही युजर्स कनेक्टेड राहू शकतील. युजर्संना २४ तास कस्टमर सपोर्ट मिळणार आहे. ग्राहकांना हवं असल्यास हा प्लान दरवर्षी आपोआप रिन्यू केला जाणार असल्याचं कंपनीनं म्हटलं.
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
काय आहे बेस्ट?
एअरटेलच्या या आंतरराष्ट्रीय प्लानची किंमत ४,००० रुपये असून यात एक वर्षाची वैधता मिळणार आहे. या प्लानमध्ये युजर्संना कॉलिंगसाठी १०० मिनिटं आणि १०० एसएमएस मिळत आहेत. तसंच इंटरनेट वापरण्यासाठी ५ जीबी डेटा मिळणार आहे. हे सर्व लाभ दीर्घकाळ देशाबाहेर असलेल्या अनिवासी भारतीयांना मिळणार आहेत. भारतात हा प्लॅन रिचार्ज केल्यास युजर्संना इंटरनेट अॅक्सेस करण्यासाठी १.५ जीबी डेटा मिळेल. कोणत्याही नेटवर्कवर बोलण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच कोणत्याही नंबरवर पाठवण्यासाठी दररोज १०० एसएमएसही मिळणार आहेत.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा नवीन रिचार्ज प्लॅन परदेशात स्थानिक सिमकार्ड खरेदी करण्यापेक्षा स्वस्त असू शकतो. ग्राहक आपला डेटा आणि कॉल वापर पाहण्यासाठी, बिलं तपासण्यासाठी आणि आवश्यक असल्यास अधिक डेटा आणि मिनिटं खरेदी करण्यासाठी एअरटेल थँक्स अॅपवापरू शकतात. रिचार्ज करण्यासाठी तुम्ही एअरटेल थँक्स अॅप किंवा पेटीएम, जीपे सारख्या इतर प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता.