Join us

Airtel Prepaid Plan: जिओच्या दुप्पट डेटा, तो ही केवळ 181 रुपयांत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 16:05 IST

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल या मोबाईल सेवा पुरवठादार कंपनीने ग्राहकांना पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी धमाकेदार ऑफर देऊ केली आहे.

नवी दिल्ली : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल या मोबाईल सेवा पुरवठादार कंपनीने ग्राहकांना पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी धमाकेदार ऑफर देऊ केली आहे. केवळ 181 रुपयांत रोज 3 जीबी डेटा मिळणार असून कॉलिंगही अनलिमिटेड करण्यात आले आहे.

टेलिकॉम टॉकनुसार एअरटेलच्या प्रिपेड ग्राहकांना 181 रुपयांत प्रत्येक दिवशी 3 जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा मिळणार आहे. शियाव 100 एसएमएसही मोफत असणार आहे. या पॅकची व्हॅलिडीटी 14 दिवसांची असणार आहे. म्हणजेच एकूण 42 जीबी डेटा मिळेल. यानुसार प्रती जीबी साठी केवळ 4.3 रुपये मोजावे लागणार आहेत. तर व्हॉईस कॉलसाठी कोणतेही बंधन नाही. हे पॅक काही ठराविक सर्कलसाठी वैध राहणार आहेत.

किंमतीच्या बाबतीत सध्या तीन जीबी एवढ्या कमी किंमतीत देणारे कोणत्याही कंपनीचे रिचार्ज नाही. यामुळे जिओच्या 198 रुपयांच्या पॅकला टक्कर मिळणार आहे. जिओच्या या पॅकमध्ये प्रति दिवशी 2 जीबी 4जी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच व्हॅलिडिटी 28 दिवसांची मिळते. तर व्होडाफोनच्या 199 रुपयांच्या पॅकमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह अनिलिमिटेड कॉल आणि केवळ 1.4 जीबी डेटा मिळतो. यानंतर पैसे कापले जातात.  

टॅग्स :एअरटेलजिओमोबाइल