Airtel Recharge Plans: जर तुम्ही वारंवार मोबाईल रिचार्ज करण्याच्या त्रासाला कंटाळला असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी असे प्लॅन्स ऑफर करत आहे ज्यांची वैधता पूर्ण ३६५ दिवस म्हणजेच एक वर्ष आहे. विशेष म्हणजे या प्लॅन्सची किंमत २५०० रुपयांपेक्षाही कमी ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे हे बजेटमध्ये अतिशय जबरदस्त ठरतात. या प्लॅन्समध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि डेटा बेनिफिट्स मिळतात.
एअरटेलचा २२४९ रुपयांचा प्लॅन आणि त्याचे फायदे
एअरटेलचा २२४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन अशा युजर्ससाठी तयार करण्यात आला आहे ज्यांना कमी किमतीत दीर्घ वैधता हवी आहे. या प्लॅनचे मुख्य फायदे काय आहेत ते जाणून घेऊ. यामध्ये पूर्ण ३६५ दिवसांची सर्व्हिस वैधता मिळते. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर पूर्ण वर्षभर मोफत अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, तर पूर्ण वर्षासाठी एकूण ३० जीबी हाय-स्पीड डेटा, जो युझर आपल्या गरजेनुसार कधीही वापरू शकतो. इतकंच नाही तर या प्लॅनसोबत ३६०० एसएमएसची सुविधा देखील उपलब्ध आहे. या प्लॅनचा रोजचा खर्च काढल्यास तो साधारण ६ रुपये इतका पडतो.
अतिरिक्त डिजिटल फायदे
या वार्षिक प्लॅनसोबत एअरटेल काही खास अतिरिक्त फायदे देखील देत आहे. यात ग्राहकांना 'Airtel Xstream Play' चा एक्सेस मिळतो, ज्याद्वारे विविध प्रकारचे मनोरंजन कार्यक्रम पाहता येतात. याशिवाय, यात 'Adobe Express Premium' चं सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे, ज्याची किंमत सुमारे ४००० रुपये आहे. या मदतीनं युजर्स फोटो एडिटिंग आणि डिझाइनिंग सारखी कामं करू शकतात.
एअरटेलचा १८४९ रुपयांचा स्वस्त वार्षिक प्लॅन
एअरटेलकडे २२४९ रुपयांपेक्षाही स्वस्त असा एक वार्षिक प्लॅन उपलब्ध आहे, ज्याची किंमत १८४९ रुपये आहे. या प्लॅनमध्येही ग्राहकांना ३६५ दिवसांची वैधता आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यासोबतच एकूण ३६०० एसएमएस दिले जातात. मात्र, या प्लॅनमध्ये डेटा मिळत नाही, त्यामुळे हा प्लॅन केवळ कॉलिंगची गरज असलेल्या लोकांसाठी उत्तम आहे. या प्लॅनमध्येही 'Adobe Express Premium' चं मोफत सबस्क्रिप्शन दिलं जातं.
Web Summary : Airtel offers budget-friendly annual plans with unlimited calling and data. The ₹2249 plan provides 365-day validity, 30GB data, and 3600 SMS. A cheaper ₹1849 plan offers calling and SMS, ideal for users needing talk-time only, both include Adobe Express Premium.
Web Summary : Airtel अनलिमिटेड कॉलिंग और डेटा के साथ बजट-अनुकूल वार्षिक योजनाएं पेश करता है। ₹2249 की योजना 365 दिनों की वैधता, 30GB डेटा और 3600 SMS प्रदान करती है। एक सस्ता ₹1849 प्लान कॉलिंग और SMS प्रदान करता है, जो केवल टॉक-टाइम चाहने वाले उपयोगकर्ताओं के लिए आदर्श है, दोनों में Adobe Express Premium शामिल है।