Join us  

'या' विमान कंपनीचा शानदार सेल; अवघ्या 1499 रुपयांत हवाई सफर करण्याची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 3:00 PM

Air Asia Pay Day Sale Offer: एअर एशिया इंडियाने (AirAsia India) स्वस्त विमान प्रवासाची ऑफर आणली आहे. 

नवी दिल्ली :  हवाई प्रवास करण्यासाठी खुशखबर आहे. येत्या काही महिन्यांत तुम्हीही विमानाने कुठेही जाण्याचा विचार करत असाल, तर आत्ताच तुमची तिकिटे बुक करू शकता. कारण, एअर एशिया इंडियाने (AirAsia India) स्वस्त विमान प्रवासाची ऑफर आणली आहे. 

AirAsia India ने स्वस्त दरात विमान तिकीट बुक करण्याची ऑफर दिली आहे. तुम्ही एअर एशिया इंडिया AirAsia India #PayDaySale अंतर्गत 1,499 रुपयांपासून विमान तिकीट बुक करू शकता. एअर एशिया इंडियाने आपला पे डे सेल  (Pay Day Sale) सुरू करण्याची घोषणा केली आहे.

एअर एशिया इंडियाचा हा सेल 28 ते 31 जुलैपर्यंत चालणार आहे. या कालावधीत केलेल्या बुकिंगवर ही ऑफर लागू होईल. म्हणजेच आता दोन दिवसांसाठी तिकीट बुक करू शकता. या योजनेअंतर्गत तिकीट बुकिंगवर 15 ऑगस्ट ते 31 डिसेंबरदरम्यान प्रवास करता येणार आहे. 

ही ऑफर एअरलाइनने मर्यादित इन्वेट्रीसाठी दिली आहे. पहिल्यांदा येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर लागू होणाऱ्या या ऑफरबाबत, विमान कंपनीने सांगितले की, या योजनेअंतर्गत ठराविक मार्गावर वाटप केलेल्या जागा विकल्यानंतर नियमित किमती लागू होतील.

कसे तिकीट बुक होईल?#PayDaySale अंतर्गत तिकीट बुक करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एअर एशियाची  http://airasia.co.in वर जावे लागेल. या ऑफरअंतर्गत बुक होणाऱ्या तिकीटावर तुम्ही 15 ऑगस्टपासून 31 डिसेंबर 2022 पर्यंत प्रवास करू शकता. दरम्यान,  यापूर्वी, एअरलाइनने 7 ते 10 जुलै दरम्यान बुक केलेल्या तिकिटांसाठी निवडक देशांतर्गत मार्गांवर 1,497 रुपयांपासून भाड्यांसह 'स्प्लॅश सेल' ची घोषणा केली होती.

टॅग्स :एअर एशियाविमान