Join us  

‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ने केली मोठी वेतन कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 5:11 AM

बँकांचे हप्ते, विमानांचे भाडे आणि इतर महत्त्वाच्या व्हेंडरांची देणी देण्यासाठी कंपनीला खेळत्या भांडवलाच्या उसनवाºया कराव्या लागत आहेत.

नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीमुळे जुलैपर्यंत महसुलात ८८ टक्के घसरण झाल्यामुळे ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ने कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात केली आहे. पायलटांच्या भत्त्यांत ४० टक्के कपात करण्यात आली आहे. आपली पालक कंपनी एअर इंडियाच्या धर्तीवरच एअर इंडिया एक्स्प्रेसने वेतन कपातीची योजना राबविली आहे. कंपनीच्या मनुष्यबळ विकास (एचआर) विभागाचे प्रमुख टी. विजयकृष्णन यांनी यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे.कोविड-१९ महामारीमुळे एअरलाइनच्या महसुलात जुलैपर्यंत ८८ टक्के घसरण झाली आहे.

बँकांचे हप्ते, विमानांचे भाडे आणि इतर महत्त्वाच्या व्हेंडरांची देणी देण्यासाठी कंपनीला खेळत्या भांडवलाच्या उसनवाºया कराव्या लागत आहेत.या पार्श्वभूमीवर खर्च कपात करणे कंपनीसाठी आवश्यक झाले आहे. प्रशिक्षणार्थी कॅप्टन्सच्या वेतनात ४० टक्के कपात होणार आहे. फर्स्ट आॅफिसर, सहपायलट, प्रशिक्षणार्थी सहपायलट यांच्या उड्डाण भत्त्यात ४० टक्के कपात होईल.२५ हजारांच्या आतील वेतनाला कपात नाही२५ हजारांच्या आत वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना कपात लागू होणार नाही. पायलटांच्या भत्त्यांत ४० टक्के कपात करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी श्रेणीसाठी ५ टक्के आणि त्यावरील तसेच सीईओ पदापर्यंतच्या कर्मचाºयांसाठी ७.५ टक्के वेतन कपात लागू राहील. विशेष करारातील कमांडरांच्या वेतनात ५० टक्के कपात करण्यात आली आहे.

टॅग्स :एअर इंडियाव्यवसाय