Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजाराला 'एआय'चा धोका; सेबी सतर्क! ‘सायबर-सुरक्षा.एआय’ टास्क फोर्स स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 10:28 IST

या पार्श्वभूमीवर सेबीने सर्व बाजार संस्थांना सतर्कतेचा इशारा देत ‘सायबर-सुरक्षा.एआय’ नावाच्या विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे.

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारातील व्यवहार आता अधिक वेगवान होत असतानाच, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) मुळे निर्माण होणाऱ्या सायबर धोक्यांनी नियामक संस्था 'सेबी'ची झोप उडवली आहे. 'अँथ्रोपिक'च्या 'मिथॉस' सारख्या प्रगत एआय मॉडेल्समुळे बाजारातील तांत्रिक यंत्रणेत त्रुटी निर्माण होऊन मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सेबीने सर्व बाजार संस्थांना सतर्कतेचा इशारा देत ‘सायबर-सुरक्षा.एआय’ नावाच्या विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे.

नट-बोल्टनी आवळला भारतीय उद्योगांचा गळा; खर्च प्रचंड वाढला; नव्या गुणवत्ता नियमांमुळे कारखान्यांना मोठा फटका

काय आहे 'मिथॉस'?

'मिथॉस' हे 'अँथ्रोपिक' या कंपनीचे एक प्रगत एआय मॉडेल आहे. हे मॉडेल कोडिंगमधील क्लिष्ट त्रुटी शोधण्यात अतिशय प्रभावी आहे. सेबीला भीती आहे की, जर हे तंत्रज्ञान चुकीच्या हातात पडले, तर शेअर बाजाराच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये घुसखोरी करणे सोपे होईल. त्यामुळे बाजारात मोठा गोंधळ उडू शकतो.

टास्क फोर्सचे काम काय?

एआयमधून उद्भवणाऱ्या सायबर धोक्यांचा अभ्यास

जोखीम कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवणे

धोक्यांची माहिती आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाण-घेवाण

सायबर घटनांचे वेळेवर अहवाल देण्याची यंत्रणा तयार करणे

तृतीय-पक्ष सेवा पुरवठादारांच्या सुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण

संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

नियमित ‘व्हल्नरेबिलिटी’ तपासणी (एआय व पारंपरिक दोन्ही पद्धतीने)

सिस्टम अपडेट्स व पॅचेस वेळेवर लागू करणे, सतत देखरेख करणे

एपीआय सुरक्षेला बळकटी देणे

English
हिंदी सारांश
Web Title : AI Threatens Stock Market; SEBI Alerts, Forms Cyber-Security Task Force

Web Summary : SEBI is vigilant about AI-driven cyber threats to the stock market. The regulator established a ‘Cyber-Security.AI’ task force after concerns arose from advanced AI models potentially exploiting vulnerabilities. The task force will focus on risk assessment, threat information exchange, and strengthening security measures for market institutions.