Join us

केवळ टेकच नाही तर HR प्रोफेशनल्सचीही नोकरी खाऊ लागला AI; IBM नं ८००० कर्मचाऱ्यांना काढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:34 IST

टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी आयबीएमनं सुमारे आठ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. पाहा का घेतेय कंपनी हा मोठा निर्णय.

टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी आयबीएमनं सुमारे आठ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. ही कपात प्रामुख्यानं एचआर (HR) विभागात करण्यात आली आहे. कंपनीचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर हे या कपातीला कारणीभूत ठरलं आहे. आयबीएमचा भर आता बॅक-ऑफिसचं काम अधिक स्वयंचलित करण्यावर आहे. कंपनीचे सीईओ अरविंद कृष्णा यांनी, आयबीएम आता वेगानं आपल्या वर्कफ्लोमध्ये एआय आणि ऑटोमेशनचा समावेश करत असल्याचं म्हटलंय.

एआय बहुतेक नोकऱ्या पूर्णपणे संपवणार नाही, तर ते कर्मचाऱ्याना पुन्हा पुन्हा कराव्या लागणाऱ्या कामापासून मुक्त करेल, जेणेकरून ते मानवी विवेक आणि निर्णय घेण्याची आवश्यकता असलेल्या क्षेत्रात लक्ष केंद्रित करू शकतील, अशी प्रतिक्रिया आयबीएमचे चीफ एचआर ऑफिसर निकेल लॅमोरॉक्स म्हणाले.

₹७० लाख कोटींच्या इंडस्ट्रीवर नजर, अंबानींचा हाती लागला 'अलादीन'चा जादूई दिवा; रॅाकेट बनला शेअर

२०० एआय एजंट्स सांभाळताहेत काम

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयबीएमनं या महिन्याच्या सुरुवातीला एचआर विभागातील सुमारे २०० पदं एआय एजंट्सनं बदलली. ही एआय टूल्स कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं, कागदपत्रांवर प्रक्रिया करणं आणि एचआर डेटा व्यवस्थित करणे अशी कामं करत आहेत. या एजंट्सना कमीत कमी मानवी देखरेखीची आवश्यकता असते आणि ते खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

नोकर कपातीला नकार

कृष्णा यांनी असंही स्पष्ट केलंय की आयबीएम केवळ नोकऱ्या कमी करत नाही तर हे कर्मचाऱ्यांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे. ते म्हणाले की कंपनी आता सर्जनशीलता, धोरणात्मक विचार आणि मानवी व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत आहे, तर प्रशासकीय आणि पुन्हा पुन्हा होणारी कामं एआयद्वारे हाताळली जात आहेत. या महिन्यात आयबीएमच्या वार्षिक थिंक कॉन्फरन्समध्ये, कंपनीनं एक नवीन टूलकिट लाँच केलं, ज्याच्या मदतीनं कंपन्या त्यांचे स्वतःचे एआय एजंट तयार करू शकतात. ही साधनं ओपनएआय, मायक्रोसॉफ्ट आणि अमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मसह देखील काम करू शकतात. 

टॅग्स :नोकरीआर्टिफिशिअल इंटेलिजन्स