Join us
Daily Top 2Weekly Top 5

फक्त ३०० रुपये खर्च आणि ६३४ कोटींची कमाई! ३२ वर्षांपूर्वीच्या एका निर्णयानं लागला जॅकपॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:21 IST

Ai.com Domain News: एखाद्याचं नशिब कधीही बदलू शकतं. सुमारे तीन दशकांपूर्वी एका व्यक्तीनं लावलेला एक 'अंदाज' आज त्यांच्यासाठी जॅकपॉट ठरला आहे.

Ai.com Domain News: एखाद्याचं नशिब कधीही बदलू शकतं. उद्योजक आरसियान इस्‍माइल यांच्या बाबतीत नेमकं हेच घडले आहे. सुमारे तीन दशकांपूर्वी त्यांनी लावलेला एक 'अंदाज' आज त्यांच्यासाठी जॅकपॉट ठरला आहे. इस्‍माइल यांनी ३२ वर्षांपूर्वी केवळ ३०० रुपयांची गुंतवणूक केली होती, ज्याचं मूल्य आज ६३४ कोटी रुपये झालं आहे. विशेष म्हणजे ही अफाट कमाई त्यांना 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) मुळे झाली आहे, ज्या तंत्रज्ञानाचा ३२ वर्षांपूर्वी ना अस्तित्वात होता ना कोणी त्याबद्दल विचार केला होता. इस्‍माइल यांनी केलेल्या या गुंतवणुकीनं त्यांना एका झटक्यात कोट्यधीश बनवलंय.

इंटरनेट डोमेनचा जॅकपॉट आणि दूरदृष्टी

हे संपूर्ण प्रकरण इंटरनेट डोमेनशी संबंधित आहे. ज्या काळात इंटरनेटचा विस्तार अत्यंत मर्यादित होता, अशा वेळी म्हणजे १९९३ मध्ये आरसियान इस्‍माइल यांनी एका डिजिटल मालमत्तेमध्ये ३०० रुपये गुंतवले होते. त्यांनी ३०० रुपये खर्च करून एक डोमेन नाव नोंदवले होते. आज एआय (AI) तंत्रज्ञानाची लाट आल्यानंतर, त्यांच्या या गुंतवणुकीवर त्यांना हजारो पट परतावा मिळालाय. 

बांगलादेशच्या आनंदावर विरजण! भारतालाही अमेरिका देणार 'टॅरिफ गिफ्ट'; निर्यातीच्या स्पर्धेतून शेजारी बाहेर

काय होतं तं जादूई डोमेन नाव?

इस्‍माइल यांनी १९९३ मध्ये 'AI.com' नावाचं डोमेन तयार केलं होतं. त्यावेळी एआयवरील संशोधन आणि चर्चा प्राथमिक टप्प्यातही नव्हती. इस्‍माइल यांनी भविष्याचा विचार करून हे केलं होतं असं म्हणणं धाडसाचं ठरेल, कारण त्यावेळी त्यांनी केवळ एक अंदाज लावून हे डोमेन खरेदी केलं होतं. एआयमुळे भविष्यात जगाची दिशाच बदलून जाईल, याची पुसटशी कल्पनाही तेव्हा कोणाला नव्हती. मात्र, आज 'AI.com' हे नाव डिजिटल जगातील सर्वात मौल्यवान नाव बनलं आहे.

तंत्रज्ञानाच्या युगात जनरेटिव्ह एआय, मशीन लर्निंग प्लॅटफॉर्म आणि ग्राहकांसाठी एआय टूल्सची मागणी प्रचंड वाढली आहे. यामुळे 'एआय' शब्दाशी संबंधित डिजिटल ब्रँडिंगचं महत्त्व वाढलंय. सध्याच्या काळात एआय क्षेत्राशी जोडली गेलेली छोटी आणि सहज लक्षात राहणारी डोमेन नावं अत्यंत मर्यादित आहेत. अशा नावांवर बड्या कंपन्या कोट्यवधी रुपये खर्च करायला तयार आहेत. याच मागणीचा फायदा इस्‍माइल यांना मिळाला. 'AI.com' हे नाव लहान असल्यानं आणि थेट एआय क्षेत्राशी संबंधित असल्यानं ते सर्वात पसंतीचं डोमेन ठरलंय.

६३४ कोटींचा व्यवहार आणि नवा मालक

या डोमेनसाठीची बोलणी २०२५ मध्येच सुरू झाली होती आणि अखेर ६३४ कोटी रुपयांना हा व्यवहार पूर्ण झाला. हे डोमेन खरेदी करणाऱ्या उद्योजकाचे नाव 'क्रिस मार्सझालेक' (Kris Marszalek) असं आहे. मार्सझालेक यांचा असा दावा आहे की, ते या डोमेनचा वापर केवळ स्वतःकडे ठेवण्यासाठी न करता, ग्राहकांसाठी एका मोठ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्ममध्ये त्याचं रूपांतर करतील. ही एक प्रकारची 'पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट' आहे, जी येणाऱ्या काळात एका मोठ्या कंपनीच्या रूपात जगासमोर येऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : ₹300 Investment Turns into ₹634 Crore Jackpot After 32 Years!

Web Summary : An entrepreneur's ₹300 investment in the 'AI.com' domain in 1993 has yielded a staggering ₹634 crore profit. This foresight in the early days of the internet and AI technology has proven exceptionally lucrative, transforming a small investment into a fortune.
टॅग्स :व्यवसायआर्टिफिशिअल इंटेलिजन्स