Kartik Aryan: कार्तिक आर्यननं पहिल्यांदाच जमिनीत गुंतवणूक करून त्याच्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. कार्तिक आर्यननं Chateau de Alibaug मध्ये २,००० चौरस फूटचा भूखंड खरेदी केलाय, ज्याची किंमत २ कोटी रुपये आहे. हा भूखंड 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा'च्या (HoABL) प्रमुख किनारी विकास प्रकल्पाचा एक भाग आहे.
या वृत्ताला दुजोरा देताना कार्तिक आर्यननं हिंदुस्तान टाईम्सला प्रतिक्रिया दिली. "आजच्या काळात अलिबाग हे गुंतवणूक करण्यासाठी सर्वात आवडत्या ठिकाणांपैकी एक बनलं आहे. ते मुंबईच्या जवळ आहे आणि मी तिथे माझे घर बांधण्याची योजना आखत आहे. मी पहिल्यांदाच जमिनीत गुंतवणूक केली आहे आणि The House of Abhinandan Lodha वर माझा पूर्ण विश्वास आहे. ही गुंतवणूक केल्याबद्दल मला आनंद आहे," असं तो म्हणाला.
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी
अमिताभ-क्रिती सनॉननंही केलेली गुंतवणूककार्तिक आर्यनच्या आधी अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांनीही येथे जमीन खरेदी केली आहे. कार्तिकनं अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन सारख्या स्टार्सच्या पावलावर पाऊल ठेवून अलिबागमध्ये गुंतवणूक केली आहे. गेल्या वर्षी, अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये १०,००० चौरस फूट जमीन १० कोटी रुपयांना खरेदी केली, ज्यामुळे त्यांचा लक्झरी रिअल इस्टेट पोर्टफोलिओ आणखी मजबूत झाला. त्यानंतर लवकरच, क्रिती सनॉननं सोल दे अलिबाग प्रकल्पात २००० चौरस फूटचा भूखंड खरेदी केला, ज्यामुळे अलिबाग बॉलीवूडच्या कलाकारांसाठी सर्वात लोकप्रिय सेकंड होम लोकेशनपैकी एक बनलंय.
कार्तिक आर्यनची संपत्ती किती?
सप्टेंबर २०२५ पर्यंत, कार्तिक आर्यनच्या एकूण संपत्तीची कोणतीही पडताळणी केलेली आकडेवारी उपलब्ध नाही, परंतु २०२४ च्या अखेरीस आणि २०२५ च्या सुरुवातीच्या अहवालांनुसार ती सुमारे ₹२५० कोटी असल्याचा अंदाज आहे. त्याची संपत्ती चित्रपटातील करिअर, ब्रँड जाहिराती आणि अलिबागमध्ये अलिकडच्या जमीन खरेदीसह अलीकडील रिअल इस्टेट गुंतवणुकीतून येते.