Join us  

Affordable Bikes:किंमत कमी, दमदार मायलेज! मध्यमवर्गीयांच्या पसंतीस उतरताहेत या चार स्वस्त आणि मस्त बाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2022 3:25 PM

Affordable Bikes In Indian Market: पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत स्वस्त आणि किफायतशीर दुचाकी खूप चांगला पर्याय ठरू शकते. या दुचाकींच्या किमती ह्या कमी असतात. सोबतच मायलेजच्याबाबतीत त्या सर्वांना वरचढ आहेत.

मुंबई - पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत स्वस्त आणि किफायतशीर दुचाकी खूप चांगला पर्याय ठरू शकते. या दुचाकींच्या किमती ह्या कमी असतात. सोबतच मायलेजच्याबाबतीत त्या सर्वांना वरचढ आहेत. इलेक्टिक बाईक खरेदी करणे तसे कठणी असतानाच या दुचाकी कमी पेट्रोलमध्ये उत्तम मायलेज देतात. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी या दुचाकी उत्तम पर्याय ठरत आहेत. आज आपण पाहुयात ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत किंमत असलेल्या आणि दमदार मायलेज देणाऱ्या दुचाकींची माहिती.बजाज सीटी १०० बजाज सीटी १०० ही कंपनीची स्वस्त बाईक आहे. ती इलेक्ट्रिक स्टार्टसह विकली जात आहे. तिची मुंबईमधील एक्स शोरूम किंमत ५२ हजार ५१० रुपये आहे. ती टॉप मॉडेलसाठी ६० हजार ९४१ पर्यंत जाते. ही दुचाकी ५० हजार रुपयांपेक्षा कमी बजेट असलेल्या सर्वात चांगल्या चांगल्या दुचाकींपैकी एक आहे. तिला १०२ सीसीचं इंजिन जोडण्यात आलेलं आहे. एका लिटरमध्ये ती ९० किमीपर्यंत मायलेज देते.  टीव्हीएस स्पोर्ट्स टीव्हीएस स्पोर्ट्स ही एक स्टायलिश दुचाकी आहे. तिच्यामध्ये काही चांगले फिचर्स देण्यात आले आहेत. तिला ९९.७ सीसीचं इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन ४-स्पीड गिअर बॉक्सने लेस आहे. दुचाकीचा पुढचा भाग टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागचा भाग हा ट्विन शॉक अबजॉबर्ससह येतो. या दुचाकीला एक लिटर पेट्रोलमध्ये ७५ किमीपर्यत पळवता येऊ शकते. मुंबईमध्ये या दुचाकीची एक्सशोरूम किंमत ५७ हजार ९६७ रुपये ते ६३ हजार १७६ रुपयांपर्यंत आहे.  हीरो एचएफ डिलक्सभारतीय बाजारांमध्ये ही दुचाकी खूप पसंत केली जाते. तसेच ती पाच वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. या दुचाकीला ९७.२ सीसी इंजिन जोडलेले आहे. एका लिटरमध्ये ही दुचाकी ८२.९ किमी एवढं मायलेज देते. या दुचाकीची मुंबईमध्ये एक्सशोरूम किंमत ही ५२ हजार ०४० रुपयांपासून ते ६२ हजार ९०३ पर्यंत आहे. तसेच तिला इंटीग्रेटेड ब्रेकिंग सिस्टिम, ५-स्पोक अलॉय व्हील्स आणि हेडलाईट ऑनसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. बजाज प्लॅटिना १००बजाज प्लॅटिना १०० हीसुद्धा सर्वात किफायतशीर दुचाकींपैकी एक आहे. २००५ मध्ये ही पहिल्यांदा लाँच करण्यात आली होती. कंपनीने आतापर्यंत या दुचाकीच्या ५ लाख युनिटची विक्री केली आहे. ही दुचाकी किकस्टार्ट आणि इलेक्ट्रिक स्टार्ट व्हेरिएंट्समध्ए उपलब्ध आहे. तिची एक्सशोरूम किंमत ५२ लाख ८६१ रुपये आहे. ती टॉप मॉडेलसाठी ६३ हजार ५४१ रुपयांपर्यंत पोहोचते. दुचाकीसोबत १०२ सीसी इंजिन देण्यात आलं आहे. तसेच १ लिटर पेट्रोलमध्ये दुचाकीला ९० किमीपर्यंत चालवता येऊ शकते. 

टॅग्स :बाईकव्यवसाय