Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण होते सिद्धार्थ भैय्या? हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; १३ वर्षांत ३७००% रिटर्न, मल्टिबॅगर स्टॉक निवडण्याची कला होती अवगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 10:08 IST

Who was Siddhartha Bhaiya: शेअर बाजारामध्ये स्मॉलकॅप मल्टीबॅगर स्टॉक निवडण्याची कला अवगत असलेले सिद्धार्थ भैया यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. सिद्धार्थ भैया हे गुंतवणूकदारांमधील एक चर्चेत असलेलं नाव होतं.

Who was Siddhartha Bhaiya: शेअर बाजारामध्ये स्मॉलकॅप मल्टीबॅगर स्टॉक निवडण्याची कला अवगत असलेले सिद्धार्थ भैया यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. सिद्धार्थ भैया हे गुंतवणूकदारांमधील एक चर्चेत असलेलं नाव होतं. त्यांनी आपल्या ७७०० कोटी रुपयांच्या पीएमएस (PMS) आणि एआयएफ (AIF) फर्म 'इक्विटास'च्या सुरुवातीच्या टप्प्यात स्मॉलकॅप मल्टीबॅगरच्या माध्यमातून २८०० टक्क्यांचा शानदार परतावा दिला आहे. त्यांचं निधन ३१ डिसेंबर २०२५ रोजी न्यूझीलंडमध्ये झालं.

Post Office ची जबरदस्त स्कीम, घरबसल्या होईल दरमहा २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे स्कीम?

कुटुंबासोबत होते परदेश दौऱ्यावर

कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की, 'इक्विटास इन्व्हेस्टमेंट'चे (Aequitas Investment) संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ भैया यांचं ३१ डिसेंबर २०२५ रोजी अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानं न्यूझीलंडमध्ये निधन झालं. ते आपल्या कुटुंबासह न्यूझीलंडमध्ये सुट्ट्या घालवत होते. ४७ वर्षीय सिद्धार्थ भैया यांनी २०१२ मध्ये 'इक्विटास इन्व्हेस्टमेंट'ची सुरुवात केली होती. यापूर्वी त्यांनी ७ वर्षे निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडमध्ये फंड मॅनेजर म्हणून काम केलं होतं.

सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय?

सिद्धार्थ भैया स्मॉलकॅप स्टॉक निवडण्यात किती माहिर होते, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, 'इंडिया अपॉर्च्युनिटीज पीएमएस फंड'नं (India Opportunities PMS Fund) ३३ टक्के सीएजीआर (CAGR) आणि १३ वर्षांत ३७०० टक्के परतावा दिला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून सातत्यानं करत होते विक्री

सिद्धार्थ भैया गेल्या दोन वर्षांपासून विक्री करत होते. 'पीएमएस फंड इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड'चा नवा कॅश रिपोर्ट (Cash Report) समोर आलेला नाही. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, २०२५ च्या बहुतेक काळात ही फंड हाऊस ८० टक्के रोख रकमेवर (Cash) बसलेली होती. याशिवाय त्यांच्या फंड हाऊसने गेल्या वर्षी दोन मोठे निर्णय घेतले होते. पहिला निर्णय गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याचा होता, तर दुसरा निर्णय भारतीय शेअर बाजारातून बाहेर पडून आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा होता. गेल्या महिन्यातच एका निवेदनात त्यांनी म्हटलं होतं की, सध्या भारतीय शेअर बाजारामध्ये एक बबल आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Siddhartha Bhaiya, Multibagger Stock Expert, Dies; Returned 3700% in 13 Years

Web Summary : Siddhartha Bhaiya, known for picking multibagger stocks, passed away from a heart attack in New Zealand. Founder of Aequitas Investment, he delivered impressive returns, including 3700% in 13 years. He was 47.
टॅग्स :व्यवसायगुंतवणूक