Join us  

Adani Group : गौतम अदानी आणखी एक कंपनी खरेदी करणार, ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 11:16 AM

दिग्गज उद्योजक गौतम अदानी आणखी एक कंपनी विकत घेण्याच्या तयारीत आहेत.

दिग्गज उद्योजक गौतम अदानी आणखी एक कंपनी विकत घेण्याच्या तयारीत आहेत. अदानी समूहाची कंपनी अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडनं (पूर्वीची अदानी ट्रान्समिशन म्हणून ओळखली जाणारी) हलवद ट्रान्समिशन लिमिटेडमधील १०० टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी शेअर खरेदी करारावर स्वाक्षरी केली आहे. अदानी एनर्जी सोल्युशन्स पीएफसी कन्सल्टिंग लिमिटेडकडून ही कंपनी खरेदी करत आहे. ही बातमी समोर आल्यानंतर अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स सुमारे 3 टक्क्यांनी वाढून 1082.40 रुपयांवर पोहोचले आहेत.

24 महिन्यात प्रोजेक्ट सुरू करणारहलवद ट्रान्समिशन लिमिटेड (Halvad Transmission) हे स्पेशल पर्पज व्हेईकल आहे, हे पीएफसी कन्सल्टिंग लिमिटेडने तयार केलेय. फेज 3 भाग A पॅकेज अंतर्गत खवरा रिन्युएबल एनर्जी पार्कमधून 7 गीगाव्हॅट अक्षय ऊर्जा वाहून नेणं हे त्याचं उद्दिष्ट होतं. अदानी एनर्जी सोल्युशन्सनं एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटलेय की अदानी समूहाच्या कंपनीनं टॅरिफ बेस्ड कॉम्पिटेटिव्ह बिडिंग प्रोसेसद्वारे (TBCB) प्रकल्प मिळवला आणि कंपनी पुढील 24 महिन्यांत प्रकल्प सुरू केला जाणार आहे. सीएनबीसी-टीव्ही 18 च्या रिपोर्टमध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात आलीये.

3000 कोटी गुंतवणारअदानी एनर्जी सोल्युशन्स सुमारे 301 किमीचा पारेषण प्रकल्प बांधण्यासाठी, मालकीसाठी, ऑपरेट करण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी सुमारे 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. या प्रकल्पात 765 केव्ही हलवद स्विचिंग स्टेशनच्या बांधकामाचाही समावेश आहे. याशिवाय, अदानी समूहाच्या कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार तिच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी अदानी ट्रान्समिशन स्टेप फोर लिमिटेडने संयुक्त अरब अमिराती स्थित Esyasoft Holding सोबत 49:51 टक्के हिस्स्याच्या जॉईंट व्हेन्चरसाठी करार केला आहे. या संयुक्त उपक्रमांतर्गत कंपनी भारतात आणि परदेशात स्मार्ट मीटरिंग प्रकल्पांवर काम करेल.

टॅग्स :गौतम अदानीअदानीव्यवसाय