Join us  

आमच्या बंदरांमध्ये पाकिस्तान, इराण, अफगाणचा माल नको, अदानी समूहाने केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 6:25 AM

Adani Group News: आमच्या कोणत्याही बंदरांत १५ ऑक्टोबरपासून इराण, अफगाणिस्तान व पाकिस्तान या देशांतून येणारा माल उतरविण्यात येणार नाही, असे Adani Groupतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : गुजरातच्या मुंद्रा बंदरात तब्बल २० हजार कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ आल्यानंतर सुरू झालेले आरोप व चौकशा, तपास यांमुळे आमच्या कोणत्याही बंदरांत १५ ऑक्टोबरपासून इराण, अफगाणिस्तान व पाकिस्तान या देशांतून येणारा माल उतरविण्यात येणार नाही, असे अदानी समूहातर्फे जाहीर करण्यात आले आहे.  अदानी समूहाच्या एपीएसईझेड या कंपनीतर्फे सोमवारी घोषणा करण्यात आली की, आमच्याकडे असलेल्या कोणत्याही बंदरात वरील तीन देशांतून येणारा कुठलाही माल उतरविण्यात येणार नाही. 

तपासणी नाहीबंदरांमध्ये आलेल्या कंटेनरमध्ये जो काही माल येतो, त्याची तपासणी करण्याचा अजिबात अधिकार नसतो. केवळ व्यवस्थापन एवढीच आमची भूमिका मुंद्रा बंदरात होती आणि अन्य बंदरांबाबतही आमचे तेवढेच काम आहे, असे एपीएसईझेडने म्हटले आहे. 

टॅग्स :अदानीअमली पदार्थव्यवसाय