Join us  

अंबानींना मिळाली आणखी एक मोठी Deal; आधी KKR, आता 'या' कंपनीनं गुंतवले ५००० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 10:35 AM

संचालक ईशा अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स रिटेल सतत आपला व्यवसाय वाढवत आहे आणि नवीन व्यवहार, गुंतवणूक मिळवत आहे.

नवी दिल्ली – आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांवर गुंतवणुकदारांचा भरवसा सातत्याने वाढत असल्याने कंपन्यांमधील गुंतवणूकही वेगाने वाढतेय. अलीकडेच ग्लोबल इन्वेस्टमेंट फर्म केकेआर(KKR) ने रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडमध्ये २००० कोटी रुपयाहून अधिक गुंतवणूक केली. तर आता आणखी एक गुंतवणुकदाराने कंपनीत ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

पीटीआयनुसार, अबू धाबी इन्वेस्टमेंट अथॉरिटीने रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडमध्ये ०.५९ टक्के भागीदारी खरेदी करण्याची घोषणा केली आहे. ही डील ४९६६.८० कोटींना झाली. रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडकडून या व्यवहाराची माहिती देण्यात आली. कंपनीने या व्यवहाराबद्दल सांगितले की, या गुंतवणुकीमुळे रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडची इक्विटी व्हॅल्यू ८.३८१ लाख कोटी रुपये झाली आहे.

तसेच या गुंतवणुकीमुळे अबू धाबी इन्वेस्टमेंट अथॉरिटीला कंपनीत ०.५९ टक्के भागीदारी मिळणार आहे. त्याचसोबत रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड इक्विटी व्हॅल्यूच्या तुलनेत देशातील टॉप ४ कंपन्यांमध्ये सामिल झाली आहे. ADIA च्या अधिकाऱ्यांनी रिलायन्स रिटेलचं कौतुक करत बाजारात मजबुतीने प्रगती आणि चांगला उद्योग करत असल्याचे म्हटलं. ही गुंतवणूक आमच्या पोर्टफोलियोतील कंपन्यांच्या अनुरुप रणनीतीसाठी आहे.

रिलायन्स रिटेल ही RIL च्या रिटेल व्यवसायाची मूळ कंपनी आहे. याचे १८५०० हून अधिक स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे किराणा, इलेक्ट्रॉनिक्सपासून फॅशन आणि इतर विभागांमध्ये व्यवसाय करते. संचालक ईशा अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स रिटेल सतत आपला व्यवसाय वाढवत आहे आणि नवीन व्यवहार व गुंतवणूक मिळवत आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये, कतार गुंतवणूक प्राधिकरणाने रिलायन्स रिटेलमध्ये ०.९९ टक्के भागभांडवलासाठी ८,२७८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर KKR कडून २०६९.५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आणि आता आणखी एक मोठी गुंतवणूक आली आहे.

रिलायन्स रिटेलच्या व्हॅल्यूएशनबद्दल सांगायचं झालं तर २०२० नंतर गेल्या तीन वर्षांत ते जवळजवळ दुप्पट झाले आहे. Reliacne Retail देशातील सुमारे २७ कोटी ग्राहकांपर्यंत पोहचलं आहे. कंपनीच्या संचालक ईशा अंबानी यांनी ADIA द्वारे केलेल्या या गुंतवणुकीबद्दल सांगितले की, आम्ही ADIA ला RRVL मध्ये गुंतवणूकदार म्हणून पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्याशी असलेले आमचे नाते दृढ करण्यासाठी उत्सुक आहोत. जागतिक स्तरावर मूल्य निर्माण करण्याच्या कंपनीच्या अफाट अनुभवाचा आम्हाला फायदा होईल आणि भारतीय रिटेल क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी चालना मिळेल.

टॅग्स :रिलायन्सईशा अंबानीमुकेश अंबानीगुंतवणूक