8th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत सरकारने अखेर ८ व्या वेतन आयोगाला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे आता केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. महागाईच्या या काळात पगारवाढीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या कुटुंबांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
आयोगाचे काम कधी सुरु होणार?वेतन आयोगाचे काम आता टीओआर (Terms of Reference) म्हणजेच 'संदर्भ अटी' मंजूर होण्यावर अवलंबून आहे. टीओआर म्हणजे एक महत्त्वाचा दस्तऐवज, जो वेतन आयोगाला कोणत्या विषयांवर काम करायचे आहे आणि कोणत्या मर्यादांमध्ये राहायचे आहे, हे सांगतो. राष्ट्रीय परिषद-संयुक्त सल्लागार प्रणालीच्या कर्मचारी बाजूचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले की, टीओआरला लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. टीओआर मंजूर झाल्यानंतरच आयोग अधिकृतपणे आपले काम सुरू करू शकेल.
कोणाला फायदा होणार?८ व्या वेतन आयोगाचा थेट फायदा सुमारे ५० लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. यात संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी आणि त्यांच्या पेन्शनधारकांचाही समावेश आहे. थोडक्यात, देशातील एकूण सुमारे एक कोटी लोकांना यामुळे आर्थिक बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे.
अहवाल आणि अंमलबजावणीअसा अंदाज आहे की, ८ व्या वेतन आयोगाचा अहवाल २०२५ च्या अखेरीस येईल आणि तो जानेवारी २०२६ पासून लागू केला जाऊ शकतो. जर सर्व काही नियोजित वेळेनुसार झाले, तर फक्त दीड वर्षात कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठा बदल दिसून येईल.
पगारात किती वाढ अपेक्षित आहे?नवीन वेतन आयोगाअंतर्गत पगार आणि पेन्शनमध्ये ३० ते ३४ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन १८,००० रुपये आहे. नवीन आयोगाच्या शिफारशींनुसार, हे वेतन वाढून ३२,९४० ते ४४,२८० रुपयांपर्यंत जाऊ शकते. आयोग लागू होण्यापूर्वीच महागाई भत्ता (DA) देखील सुमारे ६०% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
वाचा - FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
पगारवाढ ठरवण्यासाठी, सध्याच्या पगारात मूळ वेतन, महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि प्रवास भत्ता यांचा समावेश असतो. नवीन आयोगामध्ये हे सर्व घटक विचारात घेऊन एक नवीन वेतन रचना तयार केली जाईल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार लक्षणीय वाढेल.