Join us

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 09:34 IST

7th Pay Commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ग्रॅच्युइटी संदर्भात सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे.

7th Pay Commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारनं आता रिटायरमेंट ग्रॅच्युइटी (Retirement Gratuity) आणि डेथ ग्रॅच्युइटीची (Death Gratuity) मर्यादा २५ टक्क्यांनी वाढवून २० लाख रुपयांवरून २५ लाख रुपये केली आहे. ही वाढ १ जानेवारी २०२४ पासून लागू होणार आहे. याचा कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.  

केंद्र सरकारने लोकसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ केली होती. महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ झाल्यानंतर आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा डीए मूळ वेतनाच्या ५० टक्के झाला होता. त्यानंतर रिटायरमेंट ग्रॅच्युइटी आणि डेथ ग्रॅच्युइटीसह अन्य भत्त्यांमध्ये वाढ होणं अपेक्षित होतं. महागाई भत्त्यात झालेल्या वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंट ग्रॅच्युइटीसह अनेक भत्त्यांमध्ये वाढ झाली आहे. 

या कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा? 

आता १ जानेवारी २०२४ नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ४ टक्के वाढ करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा डीए ५० टक्क्यांपर्यंत वाढला होता. यापूर्वी ग्रॅच्युइटी वाढीसंदर्भात गेल्या महिन्यात ३० एप्रिल रोजी हीच घोषणा करण्यात आली होती, मात्र ७ मे रोजी ती थांबवण्यात आली. पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी अॅक्ट १९७२ नुसार एखाद्या कर्मचाऱ्यानं एखाद्या संस्थेत किमान पाच वर्षे सलग काम केलं असेल तर त्याला ग्रॅच्युईटीचा लाभ मिळेल. 

मार्चमध्ये महागाई भत्त्यात वाढ 

केंद्र सरकारने यापूर्वी मार्च महिन्यात आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली होती. त्यानंतर डीए ५० टक्के झाला आहे. या वाढीनंतर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाईपासून मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :सरकार