Join us

७५ टक्के डीमॅट खात्यांमधून वर्षात शून्य गुंतवणूक;वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 07:31 IST

जे खातेदार वर्षभरात किमान एक वेळा शेअर खरेदी अथवा विक्री करतात त्यांना सक्रिय ट्रेडर अथवा सक्रिय क्लायंट असे म्हटले जाते.

नवी दिल्ली : २०२३-२४ मध्ये शेअर बाजारात आलेली तेजी आणि आयपीओमध्ये मिळालेला उत्तम परतावा यामुळे देशात डीमॅट खात्यांची संख्या उच्चांकावर पोहोचली असतानाच सक्रिय ट्रेडर्सची संख्या सातत्याने कमी होत आहे.  जे खातेदार वर्षभरात किमान एक वेळा शेअर खरेदी अथवा विक्री करतात त्यांना सक्रिय ट्रेडर अथवा सक्रिय क्लायंट असे म्हटले जाते.

एका अहवालानुसार, देशात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक डीमॅट खाती अशी आहेत, ज्यांत मागील १ वर्षात शेअर खरेदी अथवा विक्रीचा कोणताही व्यवहार झालेला नाही. ही सगळी खाती निष्क्रिय होत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सक्रिय डीमॅट खात्यांची संख्या ३.५० कोटी होती. ती मार्च २०२३ मध्ये घटून ३.१९ कोटी झाली. सप्टेंबरमध्ये ही संख्या आणखी घटून ३.१५ कोटींवर आली.