Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगपती विनोद खोसला यांची भारताला ७० कोटींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 02:24 IST

६६ वर्षीय उद्योगपती विनोद खोसला यांनी ट्विट करत म्हटले आहे की, देशातील मृत्यू थांबविण्याची गरज आहे.

ह्यूस्टन : भारतीय वंशाचे अब्जाधीश उद्योगपती विनोद खोसला यांनी भारताला मेडिकल ऑक्सिजन आणि अन्य सुविधांसाठी ७० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.

६६ वर्षीय उद्योगपती विनोद खोसला यांनी ट्विट करत म्हटले आहे की, देशातील मृत्यू थांबविण्याची गरज आहे. लोकांचे जीवन वाचविण्याची गरज आहे. कारण, आणखी उशीर झाला तर आणखी मृत्यू होतील. त्यांनी म्हटले आहे की, भारतातील हॉस्पिटल्सकडून आपल्याला रोज १५ हजार सिलिंडर, ५०० आयसीयू बेड, १०० बेड आदींची मागणी होते. आम्हाला तत्काळ खूप काही करण्याची गरज आहे. त्यामुळे खोसला कुटुंबीय या गरजांसाठी ७० कोटी रुपये देणार आहेत. अन्य लोकांनीही तत्काळ मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस